शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ ५.५० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:16 IST

Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५.५० टक्के नागरिकांनीच दोन्ही डोस घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरानाची दुसरी लाट आता अेासरली असली तरी कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे सध्या सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५.५० टक्के नागरिकांनीच दोन्ही डोस घेतल्यामुळे डेल्टा प्लसला रोखण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या आरोग्य विभागाला लसीकरणाचाही वेग वाढवावा लागणा आहे. सुदैवाने अद्याप बुलडाणा जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र या घातक विषाणूचा अन्यत्र झालेला शिरकाव पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. सध्या जिल्ह्यातील १०७ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगननेनुसार २५ लाख ६० हजारांच्या घरात आहे. यापैकी २१ लाख ४६ हजार ९५ नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य विभागाने उदिष्ट ठेवलेले आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख २९ हजार ९२ जणांनी कोरोना प्रतिबंधासाठीची लस घेतलेली आहे. हे प्रमाण एकूण २४ टक्के असले तरी कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अवघी ५.५० टक्के म्हणजेच १ लाख ४० हजार ८७७ आहे. तर किमान एक डोस घेणाऱ्यांची संख्या ४ लाख ८८ हजार २१५ असून त्याची टक्केवारी ही १९.०७ आहे. त्यामुळे दुदैवाने डेल्टा प्लस या म्युटेशन झालेल्या कोरोना व्हायरस जर जिल्ह्यात सापडला तर आरोग्य विभागासमोरील डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१८ ते ४४ वयोगटात     ०.२२ टक्केच लसीकरण  जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील जवळपास १२ लाखांच्या आसपास नागरिक आहेत. त्यापैकी दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ही २ हजार ७२५ जणांनीच दोन्ही डोस घेतलेले आहेत. या वयोगटात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १ लाख १ हजार २०४ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे.४५ वर्षावरील व्यक्तींचे ११ टक्के

 जिल्ह्यातील ४५ वर्षावरील व्यक्तींचे ११.७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अर्थात १ लाख ४ हजार ६६५ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. पहिला डोस ३ लाख ४ हजार ७५३ (३४ टक्के) जणांनी घेतलेला आहे. ४५ वर्षावरील ९ लाख ८९ हजार २६६ जणांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उदिष्ट आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा