रुग्णालय नव्हे, हा तर कोंडवाडाच!

By Admin | Updated: August 14, 2015 00:34 IST2015-08-14T00:22:45+5:302015-08-14T00:34:33+5:30

लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात सुविधांचा अभाव; अधिकारी व कर्मचा-यांची १५ पदे रिक्त.

The hospital is not the Kondwadach! | रुग्णालय नव्हे, हा तर कोंडवाडाच!

रुग्णालय नव्हे, हा तर कोंडवाडाच!

बुलडाणा : जीर्ण झालेल्या भिंती, स्वच्छतेचा अभाव, तुटलेल्या खिडक्या दरवाजे, पसरलेले घाणीचे साम्राज्य अशा या इमारतीकडे पाहिल्यानंतर हे रूग्णालय आहे, यावर विश्‍वास बसणार नाही. हे रुग्णालय आहे की, कोंडवाडा अशीच काहीशी परिस्थिती लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रूग्णालयाची झाली आहे. लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयाला २५ गावे जोडलेली असून, शेकडो गोरगरीब नागरिकांना आरोग्याच्या सुविधा येथून पुरवाव्या लागतात.; मात्र हे ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक एक, वैद्यकीय अधिकारी तीन पदे, परिचारिका सात पदे, लिपिक तीन आणि डाटा एन्ट्रीचे एक असे १५ पदे आहेत; मात्र एकही पद येथे कायमस्वरूपी भरलेले नसून सर्व पदे रिक्त आहेत. सकाळी दोन तास गावातील खासगी डॉक्टर येथे सेवा देतात. रेकॉर्डवर मात्र दोन वैद्यकीय अधिकारी दाखविले आहेत. मग हे डॉक्टर कोठे आहेत? त्यांचा पगार कोण घेतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्ष-किरण विभागात क्ष किरणसाठी फिल्म कधीच उपलब्ध राहात नाही, इमारत पुर्णत: जीर्ण झाली आहे. लाईट फिटींग नाही. दरवाजे-खिडक्या तुटलेल्या आहेत. स्वच्छता कधीच होत नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.

Web Title: The hospital is not the Kondwadach!