महिलांसाठी हेल्पलाईन ठरतेय ‘हेल्पलेस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:34 PM2019-12-02T15:34:37+5:302019-12-02T15:35:16+5:30

पोलिसांनी सुरु केलेल्या दोन्ही नंबरच्या हेल्पलाईन फक्त बिएसएनएलच्या मोबाईलवरूनच लागत असल्याचे दिसून आले.

Helpline is becoming a helpline for women! | महिलांसाठी हेल्पलाईन ठरतेय ‘हेल्पलेस’!

महिलांसाठी हेल्पलाईन ठरतेय ‘हेल्पलेस’!

Next

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : महिला व बालकांना संकटकाळी मदत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यासाठी १०० क्रमांकाव्यतिरिक्त दोन स्वतंत्र क्रमांक उपलब्ध आहेत. मात्र १०० नंबरसह या दोन्ही नंबरच्या हेल्पलाईन हेल्पलेस ठरत असल्याचे दिसून येते.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. एकीकडे शासन अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्नशील असतांना वाईटप्रवृत्तीच्या व्यक्तींना रोखणे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. यातच महिलांना संकटकाळी पोलिसांची मदत मिळावी यासाठी राज्यातच नव्हेतर देशात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलिसांच्या १०० नंबर व्यतिरिक्त महिला हेल्पलाईन कार्यान्वीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही १०९१ व ८६९८००००११ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. हैद्राबादमधील प्रियंका रेड्डी या पशुवैद्यक युवतीवर बलात्कार करून तिला जीवंत जाळण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वीच घडला. यापूर्वी सुद्धा दिल्लीत निर्भया व कोपर्डीत चिमुकलीची हत्या झाली आहे. संपूर्ण देश या घटनेने आक्रोश करीत आहे. या अतिप्रसंगाच्या घटनेनंतर जिल्हयातील महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस प्रशासनाच्या हेल्पलाईनचा आढावा घेतला असता ‘लोकमत’च्या निदर्शनास धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी सुरु केलेल्या दोन्ही नंबरच्या हेल्पलाईन फक्त बिएसएनएलच्या मोबाईलवरूनच लागत असल्याचे दिसून आले. तर १०० नंबर सुद्धा फक्त बिएसएनएलवरून लागतो.


‘बीएसएनएल’च्याच मोबाईलची अट
पोलिस प्रशासनाच्या हेल्पलाईनवर बिएसएनएलच्याच नंबरवरून फोन लागतो. इतर खासगी कंपन्यांच्या मोबाईल क्रमांकावरून नाही. बिएसएनएलच्याच मोबाईलची अट हेल्पलाईनसाठी आहे, असे कुठेही नमुद करण्यात आले नाही हे विशेष. आज जेव्हा ‘लोकमत’ने हेल्पलाईनचा आढावा घेतला असता हे वास्तव समोर आले. पोलिसांचा १०० हा टोलफ्री क्रमांक सुद्धा खासगी कंपन्यांच्या मोबाईलवरून बॅलन्स असल्याशिवाय लागत नाही.


महिलांसाठी सुरु करण्यात आलेला १०९१ हा टोलफ्री क्रमांक फक्त बिएसएनएलच्याच मोबाईलवरून लागतो. इतर खासगी कंपन्यांच्या मोबाईलवरून लागत नसल्याची तांत्रीक अडचण आहे. जिल्हा पोलिस दलातर्फे दोन दिवसापूर्वीच याबाबत बिएसएनएलच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली आहे. लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहोत.
- हेमराजसिंह राजपूत,
अप्पर पोलिस अधिक्षक,
खामगाव


महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जोपर्यत समाजात वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. तोपर्यत अशा घटना घडतच राहतील. पण अशा घटनांना सजग राहून निश्चित टाळता येवू शकते. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दखल घेवून महिला हेल्पलाईनचे नंबर टोलफ्री करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
- नंदाताई पाऊलझगडे,
सचिव, महाराष्ट्र प्रदेश सचिव,
राष्ट्रवादी महिला काँग्रेस.

Web Title: Helpline is becoming a helpline for women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.