खामगाव तालुक्यात दमदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 00:46 IST2019-06-27T00:46:01+5:302019-06-27T00:46:16+5:30
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती मात्र बुधवारी 26 जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जवळपास एक तास पाऊस बरसत राहिला.

खामगाव तालुक्यात दमदार पाऊस
खामगाव - गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती मात्र बुधवारी 26 जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जवळपास एक तास पाऊस बरसत राहिला. यामुळे नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
संध्याकाळपासूनच शहर व तालुक्यात सर्वत्र पावसाचे वातावरण होते. रात्री अकरा वाजता खामगाव शहरामध्ये पावसात सुरुवात झाली. जवळपास सव्वा तास पाऊस बरसत राहिला. खामगाव तालुक्यात सध्या पाच टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. प्रामुख्याने बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. काही भागांमध्ये लिंबूवर्गीय पिके व भाजीपाला या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बुधवारी संध्याकाळी तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. झाडांची पडझड झाल्याने खामगाव ते माटरगाव या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती याशिवाय शहरातील सुटाळा वामन नगर भागात काही घरावरील टिनपत्रे उडाली. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले.