शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी दीड कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:54 IST

पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी रोहयोंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही दीड कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 

बुलडाणा : जिल्ह्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी रोहयोंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा नियोजन समितीमधूनही दीड कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शेत, पाणंद रस्त्याच्या तीनही प्रकारासाठी निर्धारित दरानुसार १३ ही तालुक्यांसाठीहा निधी समप्रमाणात वितरीत करण्याचे धोरण जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय समितीकडे  योजनेतंर्गतचे कृती आराखडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार विविध योजनांच्या अभिसरणातून पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अद्यापपर्यंत जिल्ह्यातून फक्त एक प्रस्ताव प्राप्त झाला होता. मात्र तोही तांत्रिक अडचणीमुळे फेर पडताळणीसाठी पाठविण्यात आला आहे. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेतंर्गत प्रामुख्याने कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि अतिक्रमण मुक्त रस्ता कच्चा किंवा पक्का रस्ता एकत्रीकरण करणे अशा तीन प्रकारात ही कामे करण्यात येणार असून रस्त्यासाठी लागणा-या साहित्याच्या वहन मर्यादेत प्रतिकिलोमीटरप्रमाणे त्यावर खर्च करण्याचे योजनेंतर्गत निर्देशित केले गेले आहे. यामध्ये कच्चा रस्ता मजबुतीकरणासाठी प्रती किलोमीटर तीन लाख ९७ हजार ३५४ रुपये, पाच किमी वहन अंतरासाठी चार लाख ७९ हजार रुपये प्रतिकिलोमीटर आणि दहा किमी वहन अंतरासाठी पाच लाख ७३ ७८१ रुपये प्रमाणे खर्च अपेक्षित आहे.दरम्यान, रस्त्याच्या माती कामासाठी साधारणत: ५० हजार रुपये खर्च प्रतिकिलोमीटर अपेक्षित आहे. तीनही प्रकारामध्ये प्रतिकिलोमीटरसाठी करण्यात येणारा खर्च हा निर्देशित मर्यादेच्या पलिकडे होऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी अतिरिक्त रक्कम लागण्यास लोकसहभाग किंवा सीएसआर, एनजीओचीही मदत घेण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे.स्वामित्व शुल्क माफकच्चा रस्ता मजबुतीकरणाच्या पहिल्या प्रकारात प्रसंगी सिमेंट पाईपचा वापर करण्यासाबेतच गौण खनिज स्वामित्व शुल्कही माफ करण्यात आले आहे. मात्र त्यात फक्त माती काम घेण्यात येऊन नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.कृती आराखडा सादर करण्याचे निर्देशपालकमंत्री शेत पाणंद रस्त्यासंदर्भात तालुकास्तरीय समितीकडून जिल्हास्तरीय समितीकडे तालुक्याचा कृती आराखडा सादर करण्याबाबत निर्देशदेण्यात आले आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समितीची यापूर्वीच स्थापना करण्यात आली आहे. मात्र अद्यापजिल्हास्तरीय समितीकडे तालुकास्तरावर यासंदर्भातील आराखडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र रोहयोतंर्गत प्राप्त झालेला दीड कोटी रुपायंचा निधी संबंधित तालुक्यांना समप्रमाणात वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेहकर उपविभागाचा कृती आराखडा जिल्हास्तरावर प्राप्त झाला असून त्यातील एक प्रस्तावात त्रुटी असल्याने दहा जुलै रोजी दुरुस्तीसाठी तो परत पाठविण्यात आला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाroad transportरस्ते वाहतूक