शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवू नये

By admin | Updated: August 21, 2014 23:18 IST

जातवैधता प्रकरणी नागपूर खंडपीठाचा आदेश

मलकापूर : मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या तीन सदस्यांचे जात पडताळणी प्रस्ताव जात पडताळणी समिती अकोलाने स्वीकारून चार महिन्यात निकाल द्यावा आणि तोपर्यंत जातवैधता पत्राअभावी सदर तीन सदस्यांना अपात्र घोषित करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्या.वासंती नाईक आणि न्या. अतुल चांदुरकर यांच्या न्यायपीठाने १९ ऑगस्ट रोजी दिले आहेत.नव्याने अस्तित्वात आलेल्या मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीची निवडणूक २३ डिसेंबरला पार पडली होती. यावेळी राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. तथापि, ४ जानेवारी २0१४ रोजी परिपत्रक काढून नामनिर्देशनपत्र दाखल करायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत जात पडताळणीकरिता प्रस्ताव दाखल करण्याची मुभा दिली होती. प्रस्ताव निवडणूक अधिकार्‍याने दुसर्‍या दिवशी जात पडताळणी प्रस्ताव समितीकडे पाठवायचे होते; परंतु सदर प्रस्ताव हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पाठविल्यामुळे जात पडताळणी समितीने ते प्रस्ताव निकालार्थ स्वीकृत न करता परत पाठविले होते. त्याविरूद्ध अतुल वनारे, सुनिता गवात्रे आणि संजय जामोदे या ग्रामपंचायत सदस्यांनी अँड.प्रदीप क्षीरसागर पाटील यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर १९ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर सुनावनी होऊन न्यायालयाने याचिकाकर्त्या सदस्यांचे जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारून त्यावर चार महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर समितीचा जात वैधतेबाबत निर्णय होईपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, या कारणामुळे या तीन सदस्यांना अपात्र घोषित करू नये, असा आदेशसुद्धा दिला आहे.