शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे अच्छे दिन.इतर पक्ष दीन!

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ,भारिप-बमसंचे खाते निरंक: शिवसेनेला तोटा, काँग्रेस चिंतेत.

राजेश शेगोकार / बुलडाणाविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पक्षीय पातळीवर निकालाचे विेषण केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील निकाल हे भाजपाला अच्छे दिन आल्याचे शिक्कामोर्तब करणारे ठरले असून, इतर पक्षाची स्थिती अतिशय ह्यदीनह्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर विजयाची हमी असताना एकही जागा जिंकता आली नाही तर भारिप-बमसंचा अकोला पॅटर्न बुलडाण्याकडे यावेळी नक्की सरकेल, असे वाटत असताना त्याचाही मार्ग बंद झाला. सेनेची संख्या कायम राहिली असली तरी बुलडाण्यातील सेनेचा लाजीरवाणा पराभव धक्कादायक आहे अन् काँग्रेसमध्ये घरचे भेदीच काँग्रेसला बुडविताना दिसले. मनसेचे इंजिन यावेळी वाजले नाही; पण चालले खूप, त्यामुळे या पृष्ठभूमीवर आता सर्वच पक्षांना नव निर्माणाची संधी मिळाली आहे.दोस्त अगर फेल हुऑ तो बुरा नही लगता, मगर वो मिरिट मे पास हुऑ तो जादा बुरा लगता है..हा थ्री इडियटमधील संवाद बुलडाणा व चिखलीत झालेल्या काँग्रेसच्या विजयाच्या पृष्ठभूमीवर चपखल बसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी विरोधाची भूमिका घेतली. पैसा नाही, दिल्लीत राहतो, संपर्क नाही, संवाद नाही, हे काय निवडून येणार, अशी चर्चा काँग्रेसवालेच करू लागले; मात्र याच आरोपांचे अस्त्र करून सपकाळ यांनी निवडणूक लढली. विचार, विश्‍वास व विकास हे तीन मुद्दे प्रभावी असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला थेट संवाद त्यांची जमेची बाजू ठरली. असाच प्रकार चिखलीत झाला. राहुल बोंद्रे यांच्याविषयी नाराजी आहे, प्रचंड रोष आहे, अशी चर्चा काँग्रेसमधूनच जाणीवपूर्वक पसरविण्यात आली होती. बोंद्रे यांनी मात्र आमदारकीच्या काळात राबविलेल्या विविध विकासाची गंगोत्री मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्याला यश आले. जातीपातीचे राजकारण मुळापासून उखडून काढत त्यांनी घेतलेली मते ही काँग्रेसला बळ देणारी आहेत; मात्र या दोघांच्या विजयाचे कौतुक करताना ह्यदोस्त मिरिटह्ण मध्ये आला, ही भावना काँग्रेसच्या काही नेत्यांना अजूनही आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून बुलडाण्यात डॉ.राजेंद्र शिंगणे हे या पक्षाची सर्वात दमदार ओळख आहे. कॅबिनेट मंत्रीपदापासून तर लोकसभेची उमेदवारी देण्यापर्यंत पक्षाने त्यांना ताकद दिली. त्यांच्या रूपाने गेल्या दोन दशकापासून राष्ट्रवादीला बुलडाण्यातून विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळत होते; मात्र या निवडणुकीत ते उमेदवार नव्हते त्यामुळे डॉ.शिंगणे यांच्याविना झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीसुद्धा ह्यविजयाविनाचह्ण राहिली आहे. खरं तर केंद्रात व राज्यात सत्तेत राहिलेल्या पक्षासाठी ही नामुष्कीची बाब आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ.शिंगणे उमेदवार असते तर कदाचीत निकाल वेगळा असता; मात्र ते उमेदवार नसले तरी राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या रेखाताई खेडेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने ही जागा गांभिर्याने घेतली होती. खुद्द शरद पवार यांनी सभा घेऊन ते अधोरेखीत केले होते, तरीही राष्ट्रवादीचा ह्यनिकालह्ण लागला. या मतदारसंघात ह्यशिंगणेह्ण यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे, त्यामुळे ते नसतील तर मग जनता त्यांचेही ऐकत नाही, हे लोकसभेतील निकालानंतर आता विधानसभेतही स्पष्ट झाले. सिंदखेडराजानंतर चिखली ही जागा राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची होती. काँग्रेसमधील दिग्गज नेते धृपदराव सावळे यांनी काँग्रेसचा हाथ व बुलडाण्याची साथ सोडून चिखली गाठली. नाती-गोती, मराठा कार्ड सहज तारून नेईल, ही त्यांची शक्तीस्थळे होती; मात्र तेच त्यांना घातक ठरली.