शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुरीला एक हजार रुपये बाजार भाव फरक द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:18 IST

सभापती सत्येंद्र भुसारी यांची मागणी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन

चिखली : सध्या महाराष्ट्रभर नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची तूर गेल्या दोन महिन्यांपासून नाफेडच्या केंद्रावर वजन मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे. अशा प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे नाफेडला म्हणजेच शासनाला शक्य नसल्यास, त्या शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव व बाजारभाव यातील फरक साधारणत: १ हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सध्या बाजारात तुरीला सरासरी ४ हजार रुपये भाव देण्यात येत आहे. हमीभावानुसार ही तफावत १ हजार रुपयांची असल्याने ती तफावत जर शेतकऱ्यांना शासनाने दिली तर सर्व प्रश्न मिटू शकेल. शिवाय नाफेडवरील गैरसोय व गैरप्रकारही टाळले जातील. तर नाफेडने आता खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर नाइलाजाने खुल्या बाजारात विकावी लागणार व त्यांना प्रति क्विंटल १ हजार ते १२०० पर्यंत नुकसान सोसावे लागणार असल्याने या मागणीचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करण्याचे नाफेडने ठरविले, तरी खरेदी करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, तर चुकारा मिळण्यासाठी त्यापुढील चाळीस ते पन्नास दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांकडे पैसेच राहणार नाहीत, तसेच पेरणीपूर्वी कर्ज भरणा करायचा कसा, मुलांचा शैक्षणिक खर्च असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत, तर सद्यस्थितीत खरेदी केंद्रावर उघड्यावर टाकलेली तूर प्रखर उन्हामुळे जीर्ण होत आहे. त्यातच पुढच्या महिन्यात अवकाळी पावसाचाही धोका आहे. त्यामुळे या सर्व बाबीवर तोडगा म्हणून खरेदी केंद्रावर आणलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक दिल्यास प्रक्रिया खर्च व कालावधीची बचत होऊन शेतकऱ्यांची होणारी परवड थांबण्यास मदत होईल व शासनावरसुद्धा कमी भार पडेल, त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मागणी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.