गिरडा जंगलात विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:47+5:302021-07-16T04:24:47+5:30

या प्रकरणात बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी समीर जलाल बागुल (२०), आमीर शेख खाबरडे (२२), सुलतान दिलवार बरडे (२३, तिघे रा. ...

Girda beat and looted students in the forest | गिरडा जंगलात विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले

गिरडा जंगलात विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले

या प्रकरणात बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी समीर जलाल बागुल (२०), आमीर शेख खाबरडे (२२), सुलतान दिलवार बरडे (२३, तिघे रा. मढ) आणि मजीद जुम्मा तडवी (२८, रा. जांभुळ, ता. जामनेर, जि. जळगाव) या चौघांना बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या चारही आरोपींकडून ४ मोबाईल खरेदी करणाऱ्या अफसर अकबर तडवी (२७, पहूर पेठ, जि. जळगाव) या पाचव्या आरोपीसही अटक केली आहे. त्यांना बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १५ जुलैला या आरोपींना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुलडाणा तालुक्यातील गिरडा हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे नागरिक फिरण्यासाठी येतात. १४ जुलैला बुलडाणा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयचे काही विद्यार्थी गिरडा येथे पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी चार विद्यार्थी हे फिरत फिरत पुढे निघून गेले होते. त्यावेळी चार अज्ञात युवकांनी या मुलांना मारहाण करून त्यांच्याकडून नगदी ७५० रुपये आणि चार मोबाईल असा ४६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला आहेता. घटनेनंतर या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या भूषण रमेश राठोड (२३, रा. डीपी कॉलनी, वाशिम) याने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी चारही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

--तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी गजाआड--

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाणेदार सारंग नवलकार यांनी आरोपींच्या शोधासाठी एक पथक गठीत गेले. सोबतच तंत्रज्ञानाची मदत घेत आरोपींचा माग काढत त्यांना अटक करण्यासाठी त्वरित पथक रात्रीच रवाना केले होते. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना १५ जुलैला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईत एपीआय सदानंद सोनकांबळे सह. पोलीस कर्मचारी नारायण तायडे, सुनील हिवाळे, दिनेश इंगळे, शेखर थोरात, सुधीर मगर, सायरा शाह व संजय ठोंबरे यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Girda beat and looted students in the forest