शहीद जवान सचिन वाघमारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:25 IST2019-02-09T05:24:57+5:302019-02-09T05:25:18+5:30

चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral funeral on the death of martyred young man Sachin Waghmare | शहीद जवान सचिन वाघमारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शहीद जवान सचिन वाघमारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बुलडाणा : चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी ‘शहिद जवान अनिल वाघमारे अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मराठा बटालियनचे जवान वाघमारे यांना बुधावारी हौतात्म्य प्राप्त झाले. गुरुवारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने औरंगाबादला आणण्यात आले.
तेथून सैन्य दलाच्या एका तुकडीने हे पार्थिव शुक्रवारी सावरगाव डुकरे येथे आणले. वीरमाता तुळसाबाई, वीरपत्नी किरण, तीन महिन्यांचा मुलगा यांच्यासह, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तथा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी, आप्तस्वकीयांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
या वेळी सैन्य दल व पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या पाच फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अनिल यांचे चुलत बंधू उमेश वाघमारे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या वेळी खा. प्रतापराव जाधव, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प.सभापती श्वेता महाले पाटील, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Funeral funeral on the death of martyred young man Sachin Waghmare