शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय गणवेश योजनेचा निधी अडकला

By admin | Updated: January 14, 2015 23:46 IST

मोताळा तालुक्यातील ३६ शाळांचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित.

मुरलीधर चव्हाण / मोताळा (बुलडाणा): शालेय सत्र सुरू होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही तालुक्यातील ३६ प्राथमिक शाळांमधील पात्र विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित आहेत. शालेय गणवेश योजनेसाठी निधी अपुरा पडल्यामुळे विद्यार्थ्यांंना दोनऐवजी एकच गणवेश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २0१४-१५ करिता खरेदी करावयाच्या गणवेशाला निधी अपुरा पडल्यामुळे मोताळा तालुक्यातील ३६ प्राथमिक शाळांतील पात्र विद्यार्थी एका गणवेशापासून वंचित राहिले आहेत. मोताळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या १२0 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. जि.प. प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथ्या वर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांंना सदर गणवेश योजनेतंर्गत प्रत्येकी दोन तथा उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग पाचवी ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांंना सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेश वितरित केले जातात. तालुक्यातील एकूण १२0 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील गणवेश योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांंची संख्या १३ हजार ६६0 एवढी आहे. यामध्ये राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत ६ हजार ५३९ तथा सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत ७ हजार १२१ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे.शैक्षणिक वर्ष सन २0१४-१५ करिता सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत २८ लाख ४८ हजार ४00 रुपयांचा निधि मिळाला होता. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी प्रतिगणवेश २00 रुपये प्रमाणे वर्ग पाचवी ते आठवीच्या ७ हजार १२१ पात्र विद्यार्थ्यांंंना दोन टप्प्यात गणवेशाचे वितरण करण्यात आले. राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत वर्ग पहिली ते चौथीचे ६ हजार ५३९ पात्र विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी १३ लाख ७ हजार ८00 रुपये निधीची गरज असताना अवघा ८ लाख ८३ हजार १५६ रुपयांचा अपुरा निधी मिळाला. त्यामुळे तालुक्यातील ३६ शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांंनी अध्रे सत्र एकाच गणवेशावर काढावे लागत आहे. यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी अनिल अकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य सरकार शालेय योजनेंतर्गत जिल्हास्तरावरून जेवढा निधी प्राप्त झाला, त्या निधीमधून गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे. अपुर्‍या निधीबाबत माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. शालेय स्तरावर आवश्यक तेवढय़ा निधीची पूर्तता झाल्यावर गणवेशाचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.