सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 04:48 PM2020-04-07T16:48:07+5:302020-04-07T16:48:48+5:30

प्रशासनाच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मेहकर येथे टरबूज, द्राक्ष या फळांची विक्री करण्यात येत आहे. 

Fruit sales farmers to direct consumers | सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक 

सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक 

Next

 मेहकर: कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून याचा फटका व्यापारी, उद्योगधंदे, छोटे व्यावसायिक यांच्यासह शेतकºयांनाही बसला आहे.  अशा परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मेहकर येथे टरबूज, द्राक्ष या फळांची विक्री करण्यात येत आहे. 
कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकºयांच्या शेतात  उत्पादित केलेला माल हासुद्धा शेतातच तर काहींच्या घरी पडून आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान भाजीपाला व फळपिके उत्पादन घेणाºया शेतकºयांच्या होत आहे. तालुक्यात वांगी, कोबी, टोमॅटो,भेंडी, कारले या भाजीपाला पिकासह  संत्रा, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद असल्यामुळे हा उत्पादित झालेला भाजीपाला व फळपिके इतर बाजारपेठेत नेणे शक्य होत नाही. सध्या भाजीपाला हराशी सुध्दा बंद आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहेत. संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी सकाळी सात ते अकरा पर्यंत वेळ दिली असल्याने परिसरातील शेतकरी प्रशासनाच्या मदतीने थेट ग्राहकांना आपला माल विक्री करीत आहेत. तालुक्यातील आंध्रुड येथील शेतकरी उध्दव नारायण देशमुख यांनी शेतात लागवड केलेले टरबूज पीक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आणून मेहकरला विक्री केले. शेतातले टरबूज थेट ग्राहकांना विक्री केले असून मंगळवारी चार टन एवढ्या मालाची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे लोणार येथील अनिल दूधमोगरे यांनी त्यांच्या शेतातील तीन क्विंटल द्राक्ष विक्रीसाठी मेहकर येथे आणले होते. स्थानिक बालाजी नगर, नरहरी महाराज चौक, विठ्ठल नगर येथे तीन क्विंटल द्राक्षांची विक्री त्यांनी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड,  कृषी सहाय्यक विवेक शिरसाट, मनोहर वैराळ, बबन बोर्डे, विलास काळे, प्रदिप खंडारे यांचे सहकार्य शेतकºयांना मिळाले. (प्रातिनिधी) 

शेतकºयांनी उत्पादित केलेल्या फळपिकांना कोरोन या संकटामुळे अडचणीचे दिवस आले आहेत. मात्र अशा परीस्थित सोशल डिस्टसिंगचे पालन करुन व प्रशासनाच्या कोरोना बाबतच्या सुचनेचे काटेकोर पालन करीत शेतकºयांनी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून फळपिकाची विक्री केली.
-विलास काळे, कृषी सहाय्यक, मोळा. 

Web Title: Fruit sales farmers to direct consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.