शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद युवतीवर बलात्कारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:42 IST

खामगाव : विकलांग व गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी मंगळवारी सुनावली.

खामगाव : विकलांग व गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी मंगळवारी सुनावली. जळगाव जामोद तालुक्यातील उसरा येथील सिद्धार्थ चंद्रमणी तायडे (वय ३०) या विवाहित युवकाने १९ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातीलच २३ वर्षीय गतिमंद व विकलांग तरुणी घरात एकटी असल्याचे पाहुन तिच्या घराचा कुड वाकवून घरात घुसला व गतिमंद आणि विकलांग असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. सदर घटना गतिमंद तरुणीच्या मोठ्या बहिणीने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तिने याबाबत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ चंद्रमणी तायडे याच्याविरुद्ध अपराध नंबर १३४/१३ कलम ३७६ (२) (एल), ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे यांनी केला. तपासाअंती प्रकरण खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ मध्ये न्यायप्रविष्ठ केले होते. सदर प्रकरणाचे सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. साक्षपुरावे व युक्तीवादानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने कलम ३७६ (२) (एल) मध्ये आरोपी सिद्धार्थ चंद्रमणी तायडे यास पाच वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने सजा तसेच कलम ४५२ मध्ये ३ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा असा निकाल येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दिला.विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपीस अटक केल्यापासून तो जेलमध्ये आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जे.एम.बोदडे यांनी युक्तीवाद केला.