शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अपवाद वगळता जिल्ह्यात औषधांचा साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह, फॅबीपिरॅवीर टॅब्लेट अन्य आवश्यक औषधी जिल्ह्यात उपलब्ध ...

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह, फॅबीपिरॅवीर टॅब्लेट अन्य आवश्यक औषधी जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे फारसे चिंतेचे कारण नाही. कोरोनासंदर्भाने आवश्यक असलेल्या औषधीचे जिल्ह्यात घाऊक विक्रेते १४ आहेत तर किरकोळ विक्रेत्यांची संख्या ४५ आहे. या सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या औषधी साठ्याची दररोज माहिती घेण्यात येते. त्यामुळे गरजेनुरूप जिल्ह्यात आवश्यक औषधी उपलब्ध होत असल्याचे एका घाऊक औषधी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.

दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्येही औषधींचा साठा भरपूर असल्याचेही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांवरील उपचाराच्या दृष्टीने फॅबीपिरॅवीर टॅब्लेट, हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह अन्य औषधांचा साठा उपलब्ध आहे. परंतु हाफकिनकडून कोरोनासंदर्भाने औषधीसाठा तुलनेने कमी येत आहे. अन्य आजारांसंदर्भातील औषधीसाठाच अधिक येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालायतील सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही बाब स्पष्ट केली.

जिल्ह्याची रेमडेसिविर इंजेक्शनची दररोजची गरज खासगी आणि शासकीय रुग्णालय मिळून जवळपास एक हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याला दररोज २०० ते ३०० च्या आसपास रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडेसिविरची अडचण नसली तरी खासगी रुग्णालयात त्याची अडचण असून त्यासाठी रुग्णांची धावपळ होत आहे. त्यातच पहिला डोस हा दोन इंजेक्शनचा असल्याने त्याची जमवाजमव करताना रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने इंजेक्शनसाठीच रुग्णांच्या नातेवाइकांची घालमेल होत आहे.

--ऑक्सिजनवर असलेले रुग्ण--

जिल्ह्यात शनिवारी २५३ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आहे. यामध्ये आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर असलेले २०५, व्हेंटिलेटरवर ४८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

--तपासणी किटचीही मुबलकता--

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचणीसाठी वर्तमान स्थितीत रॅपिड टेस्टसाठी २० हजार किट, आरटीपीसीआरसाठीही ४० हजार किट उपलब्ध आहेत. आतापर्यंत जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक किटचा संदिग्धांच्या तपासणीसाठी वापर झालेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाचे एकूण रुग्ण:- ५७,८१५

सध्या उपचार घेत असलेले:-७०४१