शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कन्यादानापूर्वीच पित्याने घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:42 AM

धानोरा (महासिध्द) : पुंडलीकराव बोंबटकार यांच्या मुलीचे गुरुवारी लग्न असल्याने, बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. किडणीच्या विकाराने बर्‍याच दिवसापासून ते आजारी होते. 

ठळक मुद्दे किडनीच्या विकाराने घेतला आणखी एक बळी धानोरा महासिद्ध गावात शोककळा 

संदीप भोपळे । लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा (महासिध्द) : गुरुवारी  मुलीचे लग्न असल्याने येथील पुंडलीकराव बोंबटकार यांच्या कुटुंबात  आनंदाचे वातावरण. लग्न तयारीची लगबग. बुधवारी मुलीला हळद लावण्याच्या कार्यक़्रमाची पूर्ण तयारी झालेली. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच. मंगळवारी रात्री पुंडलिकराव बोंबटकार यांनी जगाचा निरोप घेतला. ते किडणीच्या विकाराने बर्‍याच दिवसापासून आजारी होते. नववधू शितलला ज्या पित्याचे आशीर्वाद पाहिजे होते. तेच मिळण्यापूर्वीच काळाने लग्न समारंभाच्या पुर्वसंध्येला हिरावून घेतले. किडनी आजाराचे थैमान या परिसरात सुरु आहे. त्याचा एक नववधूपिता बळी ठरला. किडनी आजाराचा शापच या भागाला लागला की काय? पुंडलीक गणपत बोंबटकार (वय ४१) यांचेकडे एक एकर शेती. छोटीसी पानपट्टी. यातून कुटूंबाचे उदरपोषण. मोठी मुलगी शितल हिचे दीड महिन्यापुर्वी खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील रमेश ओंकार वानखडे यांचे सुपुत्र सचिन यांचेशी लग्न ठरले. लग्नाची सर्व तयारी झाली. गुरुवार लग्न असल्याने बुधवारी मुलाच्या व मुलीच्या कुटूंबियांकडे नववधू-वरांना हळद लागण्याचा कार्यक़्रम, पण नववधूला हहद लागण्यापुर्वीच पित्याची अंत्ययात्रा झाली. सर्व समाजमन हळहळले. नियतीपुढे सर्व हतबल असल्याचा पुन्हा .. आला. लग्न समारंभ या घटनेने पुढे ढकलावा लागला. आता लग्न समारंभ करण्याची जबाबदारी शितलची आई लिलाबाई यांना पार पाडावी लागणार. कारण शितल ही सर्वात मोठी बहीण, प्रतिक्षा ही लहान तर महेश भाऊ हा सर्वात लहान. आयुष्यभर आठवणीत राहिल असे दु:ख शीतलच्या वाट्याला आले असले तरी वराळाडची मंडळी ही अत्यंत समजुतदार असल्याने त्यांनी या अचानक झालेल्या आपत्तीला मनापासून साद दिली यातून भविष्यात शितलचे दु:ख कमी होण्यास मदत होईल. काळाने आपला डाव साधला. परंतु शितलला आता त्यावर मात करावी लागणार. संपुर्ण धानोर्‍यात हळहळ व्यक्त होत असून बोंबटकार कुटूंबीयांना धीर देत आहेत. 

आनंदावर क्षणात विरजन घरात लग्न समारंभ असल्याने नातेवाईक, मित्र परिवाराने घर भरून गेले होते. शितलच्या लग्नाची तयारी अंतीम टप्प्यात होती. अशात पुंडलिक बोंबटकार यांची तब्येत बिघडली. अन त्यांनी क्षणात जगाचा निरोप घेतला. क्षणात घरातील आनंदावर विरजन पडून रडापड सुरू झाली. गावकर्‍यांनी कुटूंबीयांना धीर दिला. 

प्रशासन दखल घेईल काय?पुंडलिक बोंबटकार यांनी किडणीच्या विकारासोबत झुंज देत कुटूंबाला सावरले. पण ऐन मुलीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या मुळे बोंबटकार कुटूंबीयावर दु:खाचा डोंगरच कोसळला. घरातीलच नव्हेतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा प्रकारच्या घटना या गावात घडत असतांना प्रशासनाकडून मात्र दखल घेतल्या जात नसावी यापेक्षा दुसरे दुदैव कोणते म्हणावे ! आणखी किती बळी देण्याची प्रशासन वाट पाहत असावे ?

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्य