लोकमत संवाद
योगेश फरपट : खामगाव
ेएकीकडे राज्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रुपये  खर्च केल्या जात आहेत तर दुसरीकडे बुलडाणा जिल्हय़ातील  संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा या तालुक्यात किडनीच्या  आजाराने गत पाच वर्षात पाचशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला  असल्यानंतरही या भागात किडनीच्या आजारासाठी ठोस उ पाययोजना राबवल्या गेल्या नाहीत. या रुग्णांचा किडनीच्या  आजाराने मृत्यू नाही तर यंत्रणेनेच हत्या केल्याचा घणाघाती  आरोप माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला. ‘लोकम त’च्या संवाद या सदरात सोमवारी ते प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलत  होते. 
प्रश्न - किडनी आजार निवारण जनसंपर्क अभियानाचा उद्देश  काय? 
उत्तर - बुलडाणा जिल्हय़ातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरासह   अकोला व अमरावती जिल्हय़ातील चारशेपेक्षा जास्त गावे खार पाणपट्टय़ात येतात. या गावातील पाणी पिण्यासाठी सोडा  शौचासाठीसुद्धा वापरण्यास नागरिक घाबरतात. कारण यामुळे  त्वचारोग, किडनी, पोटाचे विकार आदी आजारांची लागण  होण्याचा धोका आहे. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्हय़ातील  संग्रामपूर, नांदुरा, जळगाव जामोद या गावांमधील ५00 पेक्षा  जास्त नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. या  प्रकाराबाबत जाणून असताना त्याची कुठलीही नोंद शासनाकडे  नसणे ही गंभीर बाब आहे. शासनाचे तसेच राज्यकर्त्यांचे लक्ष या  आजाराकडे जावे व या लोकांसाठी ठोस उपाययोजना व्हावी  यासाठी किडनीच्या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या  कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती संग्रहित करीत आहे. त्यासाठी  किडनी आजार निवारण जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. 

प्रश्न - जनसंपर्क अभियानादरम्यान आपणास काय जाणवले?
उत्तर - खारपाणपट्टय़ात अद्यापही शुद्ध जलपुरवठा नावापुरताच  होत आहे. दोन-चार गावे सोडली तर नागरिकांच्या नशिबी दूषित  पाणीच पिण्यात येत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.  गावात शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी, ग्रामसेवक,  आरोग्यसेवक हे जबाबदार कर्मचारी आहेत. किडनीच्या  आजाराने दर पंधरवड्याला एक मृत्यू होत असताना याबाबत  शासनाला कुणीच काहीच माहिती दिलेली दिसत नाही. शिवाय  नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे तहसीलदार,  तालुका आरोग्य अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे  दिसून आले. या गावामध्ये औषधोपचार, सुविधा पुरवल्या जात  नसल्याचेही प्रकर्षाने जाणवले. या प्रकाराबाबत मी लेखी  शासनाला कळवले आहे. 

प्रश्न - किडनी रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ पली पुढील भूमिका काय असेल?
उत्तर - एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खारपाणपट्टय़ातील लोकांचे मृत्यू  होत आहेत. तरी आरोग्य व महसूल यंत्रणा झोपेत आहे, याचे  आश्‍चर्य वाटते. जिल्हा प्रशासनाचे या प्रकाराचे लक्ष  वेधण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबरला जळगाव जामोद येथील उ पविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्याचे  ठरवले आहे. जोपर्यंत शासन किडनी रुग्णांसाठी ठोस उ पाययोजनांचा कृती आराखडा सादर करीत नाही तोपर्यंत बैठा स त्याग्रह सोडणार नाही. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा  मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी यांनासुद्धा अवगत करून  दिले आहे.

प्रश्न - शासनाकडे आपण काय मागणी केली आहे ?
उत्तर - जनसंपर्क अभियान १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.  एसडीओ कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्यापूर्वी जिल्हाधिकारी  व आरोग्य उपसंचालक अकोला यांनी दखल घेऊन आपल्या  अधीनस्त कर्मचार्‍यांना या गावाचा सर्व्हे करण्याच्या सुचना  द्याव्यात. जेणेकरून त्यांना परिस्थिती लक्षात येऊ शकेल. माहि तीच्या आधारावर किडनी आजाराच्या निवारणासाठी ठोस अँ क्शन प्लान तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करावी. 

प्रश्न - बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना  भ्रष्टाचार निर्मूलन समितीची कार्यपद्धती काय?
उत्तर - पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार उघड करण्यासाठी काही  सहकार्‍यांना सोबत घेऊन बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समिती तयार केली आहे. या  माध्यमातून खारपाणपट्टय़ातील गावात झालेल्या पाणीपुरवठा  योजनांची स्थिती, त्यात झालेला भ्रष्टाचार उघड करून दोषींना  शिक्षा व्हावी. केलेल्या गैरप्रकाराची रिकव्हरी व्हावी हा यामागील  उद्देश आहे. 

प्रश्न - १४0 गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत काय  सांगू शकाल?
उत्तर - खारपाणपट्टय़ातील १४0 गावांसाठी वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना आखण्यात आली. कोट्यवधी रु पये खर्च झाले असताना अद्याप ३0 गावातही पाणी पोहचले  नसल्याचे वास्तव जाणवले. ज्या गावात पाणी पोहचते तेही  अशुद्धच येत असल्याचे गावकर्‍यांशी चर्चेतून समजले. एकीकडे  नागरिक पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहे तर  दुसरीकडे ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी कर भरण्यासाठी सक्ती  केली जात असल्याची विदारक परिस्थिती या भागात आहे.  अधिकार्‍यांचे तर सोडाच; पण स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे  कानाडोळा करीत असल्याचे जाणवले. 

प्रश्न - किडनी रुग्णांसाठी काय करावे असे आपणास वाटते?
उत्तर - किडनी आजाराने बाधित असलेल्या रुग्णास दर तीन ते  पाच दिवसाला डायलेसिस करावे लागते. शेगाव व खामगावा तील डायलेसिसची सुविधा नावापुरतीच सुरू आहे. पर्यायाने  रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी खासगीत उपचार घ्यावा लागतो.  यासाठी प्रत्येक रुग्णास दोन लाख रुपये उपचारासाठी मदत देण्या त यावी. किडनी आजाराने बाधित असलेल्या रुग्णास प्राथमिक  उपचारासाठी ५0 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे. अनेक  गावात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याचे जाणवले. घरातील कर्ता  पुरुष गेल्याने संकटात सापडलेल्या अशा कुटुंबांना प्रत्येकी ४  लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे.