बाप-लेकांना रस्त्यात अडवून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:44 IST2022-10-04T14:43:24+5:302022-10-04T14:44:36+5:30
जलंब येथील संतोष नरवाडे (२५) आणि त्यांचे वडील रविंद्र नरवाडे सोमवारी किराणा सामान घेऊन दुचाकीने घरी जात होते.

बाप-लेकांना रस्त्यात अडवून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
खामगाव : खामगाव येथून जलंब येथे दुचाकीवरून किराणा सामान घेऊन जात असलेल्या बाप-लेकांना अनोळखी सहा जणांकडून रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. खामगाव- जलंब रस्त्यावरील वाडी येथे ही घटना सोमवारी रात्री घडली.
जलंब येथील संतोष नरवाडे (२५) आणि त्यांचे वडील रविंद्र नरवाडे सोमवारी किराणा सामान घेऊन दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, वाडी येथील एका लॉन्सजवळ अनोळखी सहा जणांनी त्यांना वाटेत अडविले. संतोष नरवाडे याला काही कारण नसताना मारहाण सुरू केली. यावेळी संतोषचे वडील वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही अनोळखी इसमांनी मारहाण केल्याची तक्रार संतोष नरवाडे यांनी शहर पोलीसांत दिली. या तक्रारीवरून शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.