शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरडून गेलेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

लोणार तालुक्यातील ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडले; कास्तकार अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत.

लोणार : गतवर्षी झालेल्या ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील ३ हजार १२ शेतकर्‍यांचे ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडून गेल्याने शेतकर्‍याच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेले शेतकरी वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत मदतीच्या प्रतिक्षेत असून खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर चिभडे यांनी केली आहे.
गतवर्षी २३ जुलै २0१३ रोजी तालुक्यात एका दिवसात ४२0 मीमी १७ इंच एवढा पाऊस पडल्याने तालुक्यातील आठही जलाशये १00 टक्के भरली होती.
नद्या नाल्यांना पूर आल्याने नदी नाल्याकाठच्या शेताचे मोठे नुकसान झाले होते. ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील टिटवी, गोत्रा, नांद्रा, रायगाव, धाड, गायखेड, देऊळगाव कुंडपाळ, येवती, वझर आघाव, चिंचोली सांगळे, वडगाव तेजन, शारा आदी ठिकाणच्या ३ हजार १२ शेतकर्‍यांची ७१२ हेक्टर शेत जमीन खरडून गेलेली आहे.
यामध्ये खरडून गेलेल्या परंतु दुरुस्त होणार्‍या ६६१ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणार्‍या ५२ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार होती. मात्र वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे.
अतवृष्टीनंतर झालेली गारपीट आणि आता पुन्हा पेरणीच्या काळात पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजावर अस्मानी सोबत सुलतानी संकट ओढावले आहे.
खरडून गेलेल्या क्षेत्राचा सर्वे होऊन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवूनही शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तात्काळ मदतीचे वाटप करण्याची मागणी पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर चिभडे यांनी केली आहे.
तालुका कृषी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकसान भरपाईची खात्री दिली. अतवृष्टीमुळे खरडून गेलेल्या ७१२ हेक्टर क्षेत्रापैकी ६६0 हेक्टर दुरुस्त होणारे असून यासाठी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणारे ५२ हेक्टर साठी २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसानीचा संपूर्ण अहवाल सर्वेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला असून शासन स्तरावरुन निधी प्राप्त होताच शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.