शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप

By admin | Updated: January 14, 2015 23:50 IST

पीकविम्याचेही पैसे थकले; बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी केली सरसकट मदतीची मागणी.

बुलडाणा: शेतकर्‍यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे; मात्र शेतकर्‍यांना सरसकट मदत न देता हेक्टरची अट टाकल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. राज्य शासनाने शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंंत सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, निमखेडी, ब्राम्हंदा, पांगरखेड, चुनपिंप्री येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना निवेदन देऊन शासनाच्या या पॅकेजवर आक्षेप घेतला आहे. या शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, शासनाने नैसर्गिक आपत्तीचे पॅकेज जाहीर करताना अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी दोन हेक्टरपर्यंत र्मयादा ठेवली आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांकडे दोन हेक्टरपेक्षा एक आर जास्त जमीन असली तरी त्या शेतकर्‍यांच्या केवळ एक हेक्टर शेतजमिनीलाच आर्थिक मदत मिळणार आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. शासनाने पॅकेज जाहीर करताना भेदभाव केल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे; तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकरी केंद्रस्थानी मानून शासनाने सरसकट दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.