शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

शेतकऱ्यांची  आता रब्बी पीक कर्जासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:37 PM

Crop loan, Farmer in Buldhana तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज मिळाले नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता असून दीड लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खरीप हंगामात कर्जमाफी न मिळाल्याने पीक कर्जाचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.दरम्यान कर्जमाफी न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी सद्या त्रस्त आहेत. आधार प्रमाणिकरण केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पुन्हा आधार प्रमाणिकरण करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची पिककर्जाची कसरत रब्बीतही आहेच. एकूण उदिष्ठाच्या ४० टक्के टक्के शेतकºयांना खरीपात पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. गेल्या चार ते पाच वर्षात महत्त्मस्तरावर शेतकºयांना खरीपाचे पीक कर्ज वाटप झाले असले तरी अनेक शेतकºयांना प्रत्यक्षात कर्जमाफीमधील तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज मिळाले नव्हते. अशांना येत्या काळात कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे अशा शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.३० सप्टेंबर रोजी खरीपाच्या पीक कर्जाची मुदत संपली असून एक आॅक्टोबर पासून रब्बीसाठी पीक कर्ज उपलब्ध करण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान ३१ डिसेंबर पर्यंत रब्बीसाठी पीक कर्ज वाटप करता येणार आहे. त्यासाठी यावर्षी ४० हजार ३१४ शेतकºयांना रब्बी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ बँकांना देण्यात आले असून २७३ कोटी ३७ लाख रुपयापर्यंत रब्बीसाठी पीक कर्ज देण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात २०१३ नंतर २०१९ आणि आता २०२० मध्ये चांगला पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात कृषी विभागाच्या नियोजनापेक्षाही अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीड लाख हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेने हालचाली सुरू केल्या असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी