शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

खामगाव तालुक्यातील शेतक-यांची पिकांच्या संरक्षणासाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:00 AM

खामगाव :  शेतमालाचे भाव पडले असल्याने उत्पन्न आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवितानाच शेतक-यांची दमछाक होत आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतक-यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशेतक-यांपुढे तापमान वाढीचा पेच

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शेतमालाचे भाव पडले असल्याने उत्पन्न आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवितानाच शेतक-यांची दमछाक होत आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतक-यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते. वाढत्या तापमानामुळे डाळिंब आणि केळी पिकाच्या संरक्षणासाठी शेतक-यांना अतिरिक्त भुर्दंड  सोसावा लागत असल्याचे चित्र परिसरात आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसत तालुक्यातील काही बागायतदार शेतकºयांनी डाळिंब आणि  केळीचे उत्पादन घेतले आहे. ही पिके ऐन बहरावर असतानाच सूर्यदेवाची व्रकदृष्टी या पिकांवर पडली आहे. वाढत्या तापमानामुळे हातातोडांशी आलेला घास हिसकावल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे गेल्याच आठवड्यात काही शेतकºयांनी आपल्या उभ्या शेतात गुरे घुसविण्याचा प्रकार समोर आला. वांगी आणि टरबूज पिके जनावरांना चारा म्हणून शेतकºयांनी खाऊ घातली. दरम्यान, परिसरातील अनेक विहिरी आटल्यामुळे मुदतीपूर्वीच काही शेतकºयांनी कांदा पीक काढले आहे. हीच परिस्थिती इतर पिकांचीही आहे. केळीला करप्या रोगाची लागण झाली असून, शेकडो हेक्टर शेतातील केळी पाण्याअभावी सुकली आहे, तर शेतातील उभ्या पिकांपासून आशा असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या शेतकºयांनी उन्हापासून पिके वाचविण्यासाठी धडपड चालविली आहे. डाळिंब पिकाच्या संरक्षणासाठी काही शेतकरी ‘नॉनवॉवेन फॅब्रिक्स’चा  वापर करीत आहेत. नॉनवॉवेन फॅब्रिक्स एक प्रकारचे संरक्षणात्मक आवरण असून, सूर्यप्रकाश, लहान पक्षी आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यास उपयोगी आहे. 

केळीच्या संरक्षणासाठी ‘नेट’चा आधार!वाढत्या तापमानापासून केळीचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकºयांनी घरगुती उपाययोजना शोधून काढली आहे. केळीचे घड करपू नये, यासाठी हिरव्या नेटचा आधार काही शेतकरी घेत असल्याचे दिसून येते. ‘नॉनवॉवेन फॅब्रिक्स’ या महागड्या उपायाला पर्यायी व्यवस्था म्हणून काही शेतकरी केळीचे घड हिरव्या नेटने झाकत आहेत. यामुळे केळी आणि काही अंशी पपई या पिकाचे संरक्षण होत असल्याचे रोहणा येथील बागायतदार शेतकरी संतोष गव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगाव