Farmer injured in bear attack in Buldhana District | अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

बुलडाणा: चिखली तालुक्यातील करणखेड शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात ४८ वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना चार आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. दरम्यान जखमी व्यक्तीवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेत राजेंद्र दिलीप सपकाळ हे जखमी झाले आहेत. बुलडाणा वनपरीक्षेत्रातंर्गत करणखेड शिवारात गावालगतच्या गट क्र. ५६ मध्ये माणिकराव सपकाळ यांच्या शेतातून राजेंद्र सपकाळ हे बैल घेवून जात असताना मोठ्या नालीत बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

 

 

 

 

 

Web Title: Farmer injured in bear attack in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.