शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

मक्याची निर्यात घटली

By admin | Updated: February 24, 2015 00:15 IST

रेल्वेचे उत्पन्न घटले; मोटारमालकांसह हमालांवरही संक्रांत.

हनुमान जगताप /मलकापूर (जि. बुलडाणा) विदर्भ प्रवेशद्वारी व परिसरात या हंगामात पावसाने ऐनवेळी पाठ फिरविली. परिणामी मक्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे मक्याची निर्यात ६0 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे. रेल्वेला त्यात लाखो रुपयांचा तोटा झाल्याचे सांगितले जात असून वाहतूक करणार्‍या मोटारमालक व हमालांवर सुध्दा या दुष्काळाची संक्रांत ओढावली आहे. मलकापूर रेल्वे मालधक्क्यावरुन दरवर्षी लाखो क्विंटल मक्याची निर्यात होते. त्यातून रेल्वेला चिकार उत्पन्न होते. स्थानिक स्तरावरच्या मक्याची निर्यात देशभरासह विदेशातही होते. या प्रक्रियेत येथील ट्रकमालक व हमालांची भरपूर कमाई दरवर्षी होते. या हंगामात मलकापूर व परिसरातील भागात ऐनवेळी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. म्हणजे मक्याच्या पिकाला मोक्याच्या क्षणी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात सुमार घट झाली. परिणामी मलकापूर रेल्वे मालधक्क्यावरुन दरवर्षी होणार्‍या मक्याच्या निर्यातीत ६0 टक्क्यांनी घट झाली आहे. याविषयी माहिती घेतली असता दरवर्षी स्थानिक रेल्वेच्या मालधक्क्यावरुन ७२ ते ७५ रॅक निर्यात होतात. यावर्षी त्यात ६0 टक्क्यांनी घट झाली आहे. स्थानिय ट्रकमालकांचा मोठय़ा प्रमाणातील व्यवसाय त्यावर निर्भर असतो. मात्र या हंगामात त्यांच्यावर व हमालांवरही संक्रांत ओढावल्याचे चित्र आहे.