शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 4:52 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.

बुलडाणा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याती सुमारे २ हजार ५९२ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०१९ रविवार, १७ जुन रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एका सत्रामध्ये होणार आहे. परीक्षेसाठी बुलडाणा येथील सात परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात ५०४ परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३६०, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, सहकार विद्या मंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ४५६,  रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात २१६, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ४५६ परीक्षार्थी व पंकज लद्धड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंट स्टडीज चिखली रोड येथील परीक्षात केंद्रात २६४ परीक्षार्थी परीक्षेस बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अशाप्रकारे एकूण सात परीक्षा केंद्रात १०८ खोल्यांच्या माध्यमातून २ हजार ५९२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी १० वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन/पेन्सील, ओळखीचे दोन पुरावे व त्याच्या छायांकित प्रती आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजिटल डायरी, अन्य दूरसंचार साधने, बॅग्ज आदी आक्षेपार्ह वस्तू, साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एका ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी, अशा सुचना केंद्र प्रमुख तथा आरडीसी राजेश पारनाईक यांनी दिल्या आहेत. परीक्षेची जबाबदारी २१० अधिकारी, कर्मचा-यांवरया परीक्षेचे कामकाज पाहण्यासाठी एकूण २१० अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.  परीक्षेकरीता एक भरारी पथक प्रमुख, दोन समन्वय अधिकारी, सात उपकेंद्रप्रमुख, ३७ पर्यवेक्षक, १२५ समवेक्षक, १४ परीक्षा लिपीक, २४ चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा एकूण २१० अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाbuldhanaबुलडाणा