शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शेती मूल्यवर्धित आयोग स्थापन करा

By admin | Updated: January 19, 2015 02:17 IST

बुलडाणा येथील विद्रोही साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात झाल्या नऊ गटचर्चा.

बुलडाणा : शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे शेतीसाठी शासनाने शेती मूल्यवर्धित आयोग उभा करावा व दर पाच वर्षांनी आयोगाने चर्चा करून शेतमालाचे भाव ठरवावेत. याशिवाय शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी स्वत: आंदोलन उभे करावे. त्याशिवाय शेतकर्‍यांना चांगले दिवस येणार नाहीत, असा सूर रविवारी रंगलेल्या 'शेतकरी आत्महत्या, नव्हे कर्जबळी' या गटचर्चेतून निघाला.तेराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात एकूण नऊ विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. बहुतांश चर्चेमध्ये आदिवासी, महिला, विद्यार्थी व तरुणांनी सहभाग घेतला. 'मनुस्मृती दहन दिन : भारतीय स्त्रीमुक्ती दिन' या विषयावर दीपाली तेंडुलकर यांनी चर्चा केली. आदिवासी स्त्रिया बहुपत्नीत्व, संपत्तीत महिलांचा वाटा, घटस्फोट या विषयांवर आजही संघर्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 'जल, जंगल आणि जमीन' या विषयावरील गटचेर्चेत प्रा. श्याम मुडे यांनी विस्ताराने मांडणी करताना शेतकरी पॅकेज हे तकलादू व शेतकर्‍यांची थट्टा करणारे असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर शंका घेणार्‍या तमाम लेखणी कसाई कुबेरांचा यावेळी निषेध करण्यात आला. 'शिक्षणातील ब्राह्मणीकरण जागतिकीकरण आणि मनुवादाचे नूतनीकरण' या विषयावर दिलीप गावित यांनी सद्य:स्थिती मांडली. 'भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची वाट' या चर्चेत ज्वाला मोरे यांनी भूमिका मांडली. 'महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षण दिन' यावरील चर्चेत विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेतला. याशिवाय 'वाढते सामाजिक अत्याचार आणि समतेचे प्रश्न', 'वाड्मयीन नियतकालिके आव्हाने', 'बहुजनांचे कलाभान काल आणि जागतिकीकरण, खाजगीकरण उदारीकरण', 'जात पंचायत आणि जातिअंताचा प्रश्न' या विषयांवर गटचर्चा चांगलीच रंगल्या. संचालन रमेश आराख यांनी केले.