ट्रॅक्टरच्या धडकेत अठरा वर्षीय युवकाचा मूत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 11:59 AM2021-06-27T11:59:14+5:302021-06-27T12:00:03+5:30

Accident News : संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथील एका यूवकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Eighteen-year-old killed in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत अठरा वर्षीय युवकाचा मूत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत अठरा वर्षीय युवकाचा मूत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क   
संग्रामपूरः ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामूळे संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथील एका यूवकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वकाना शिवारातील बेंबळा नदी पात्रात घडली. निष्काळजीपणा व भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविणे १८ वर्षीय युवकाच्या जीवावर बेतले.
ट्रॅक्टर क्रमांक एमएच- २८- एजे -४६८५ च्या चालकाने निवाणा येथील योगेश महादेव डांमरे याला धडक दिली. योगेश ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. 
दरम्यान मृतकाचे वडील महादेव जगदेव डांमरे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनला आरोपी ट्रॅक्टर चालकाविरोधात पोलिसानी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रेती उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वाहन नदीपात्रात गेले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे तालुक्यात अवैधरित्या होणाऱ्या रेतीची व गौण खनिजाची वाहतूक थांबविण्याची मागणीही नागरिक करत आहेत.

Web Title: Eighteen-year-old killed in tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.