शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे अर्थकारण धोक्यात?

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

पावसाची हुलकावणी; बुलडाणा जिल्हाभरात केवळ तीन टक्के पेरण्या.

बुलडाणा : जिल्हाभरात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याने पिकांच्या उत्पादनासह त्याच्या दर्जावर व भावावरही परिणाम होणार असल्याची चिंता शेतकर्‍यांसह व्यापारीवर्गालाही लागली आहे. त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे शेती व शेतीवर आधारित अर्थकारणच धोक्यात आले आहे.
गेल्या वर्षी वरूणराजाच्या कृपेने सर्वच पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आल्याने बाजारपेठेत चैतन्य होते. त्यामुळे अन्नधान्यासह सर्व वस्तूंचे भाव आवाक्यात आले व बाजारपेठेत मोठी उलाढाल दिसून आली. यंदा मात्र पावसाळ्य़ाच्या सुरुवातीपासूनच वरुणराजाने हुलकावणी देण्यास सुरूवात केल्याने सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजासह व्यापारी तसेच सर्वसामान्यांना असणार्‍या महागाईच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. बाजारपेठेत उलाढालही मंदावली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी आपल्याकडे असलेला माल बाजारात आणण्यापेक्षा भविष्याच्या विचाराने तो घरातच ठेवणे पसंत करीत आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे; तसेच ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नसल्याने तो बाजारात खरेदीसाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बाजारात आतापासूनच २५ टक्क्याने उलाढाल ठप्प झाली आहे.
जून महिना संपत आला तरी उडीद, मूग, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, करडई या पिकांची अजूनही पेरणी झालेली नाही. ही पेरणी लांबल्याने एक तर त्याच्या उत्पादनात घट येऊन उतारा कमी येऊ शकतो किंवा त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उत्पादनात घट म्हटली तर मालाच्या भाववाढीचे संकट आहे किंवा दर्जा घसरला तर शेतकर्‍याला भाव कमी मिळेल किंवा चांगल्या दर्जाचा माल भाव खाण्याची शक्यता आहे. याची व्यापार्‍यांसह ग्राहकांनाही झळ सोसावी लागणार आहे. मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कपाशीचे पीक वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घेतल्या जात आहे. दोन हजार लिटरचे टँकरसाठी १ ते दीड हजारापर्यंत रक्कम मोजून शेतकरी पीक वाचवित असल्याचे चित्र आहे.


प्रकल्प               साठा (दलघमी)         टक्केवारी
वन                        ४0३.३९               ५८.३0
पेनटाकळी               ५५६.६0                ३0.२४
खडकपूर्णा                ५१८.५१                ५४.३७
मन                        ३६५.७५               २0.0४
तोरण                      ४0२.९0               १९.५२
उतावळी                   ३६३.८४               १९.५६
नळगंगा                   २९१.८0               ६३.८८
पलढग                     ४00.४४               ४८.६0
ज्ञानगंगा                  ४0१.७५                ७0.0६
कोराडी                     ५४४.३0                ७0.७७
मस                         ३२२.९४                ५८.७१

* ज्वारी, उडीद, मूग, बाजरी, मका अशा इतर कोणत्याही पिकांची पेरणी झालेली नाही. फक्त कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी पेरणी किंवा लागवडीचे धाडस केले आहे.
**खरीप हंगामाखाली व्यापणार्‍या सात लाख ४८ हजार ८00 हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १९ हजार २९१ हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. उरलेले क्षेत्र तसेच पेरणीविना तसेच पडून आहे.
***१५ दिवसांपासून अन्नधान्याचे भाव स्थिर आहे; मात्र अजून १0 ते १५ दिवस पाऊस लांबला तर आतापासूनच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढून महागाईचे चटके सोसावे लागू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.