शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णाचे पाणी सोडल्याने पिकांना जीवदान

By admin | Updated: July 22, 2015 23:59 IST

चिखली तालुक्यातील सहा हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी.

चिखली (जि. बुलडाणा) : जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात आहेत. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकर्‍यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीपणामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली. ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आणि लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांची पिके वाचविण्यात यश आले. जिल्ह्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र तसे फारच कमी आहे, केवळ विहिरी आणि नद्यावरूनच शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळत असे; मात्र चिखलीचे तत्कालीन आमदार भारत बोंद्रे यांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीवर मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे पेनटाकळी प्रकल्पाचे काम सुरु झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भारत भाऊंचा पाटबंधारे मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांनी खडकपूर्णा आणि जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी वेगाने प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून खडकपूर्णा प्रकल्पाला मंजुरात मिळवूनही घेतली. खडकपूर्णा प्रकल्पाचे भूमिपूजन ना.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले आणि या खडकपूर्णाचे काम पुर्णत्वाकडे जात असतानाच प्रकल्पातील पाण्याचा लाभ तालुक्यातील शेतकर्‍यांना होत असल्याचे समाधान आज या प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ ची पाहणी करताना शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते.खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ चा लाभ हा पुर्णपणे चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांना होणार आहे. यामध्ये तालुक्यातील भरोसा, रामनगर, रोहडा, गांगलगाव, कवठळ, मुरादपूर, देऊळगाव घुबे, अमोना, कोनड, कोलारा, भालगाव अश्या गावांना या टप्प्याचा लाभ होणार आहे. काहींना आजच होत आहे. यावर्षी मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतर महिनाभरापासून पावसाने उघाड दिल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. अश्यातच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी अमरावती विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करुन या परिसरातील शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली आणि ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली