दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

By योगेश देऊळकार | Updated: October 29, 2023 15:48 IST2023-10-29T15:47:50+5:302023-10-29T15:48:08+5:30

भरधाव वेगात दुचाकी चालवून ती अनियंत्रित झाल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी हिंगणा दादगाव ते नारखेड रस्त्यावरील सत्यम टेलर्स यांच्या शेताजवळ घडली.

Driver dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

नांदुरा : भरधाव वेगात दुचाकी चालवून ती अनियंत्रित झाल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी हिंगणा दादगाव ते नारखेड रस्त्यावरील सत्यम टेलर्स यांच्या शेताजवळ घडली. याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशन येथे अपघातामुळेमृत्यू झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप वसंता खोड (३५) हे त्यांच्या दुचाकीने नांदुरा येथे जात असताना हिंगणा दादगाव ते नारखेड रस्त्यावरील सत्यम टेलर्स यांच्या शेताजवळ त्यांचा चुलत भाऊ विष्णू किसन खोड ४५) हे दुचाकीसोबत खाली पडलेले दिसले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाल्याचे दिसले. त्यांनी गावातील श्रीराम शालीकराम खोड, शंकर राजाराम खोड यांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी विष्णूला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहे.
 

Web Title: Driver dies in two-wheeler accident