शेगावात कचरापेटीचे वितरण

By Admin | Updated: June 1, 2015 02:13 IST2015-06-01T02:13:11+5:302015-06-01T02:13:11+5:30

स्वच्छता फाऊंडेशनचा उपक्रम.

Distribution of garbage in Shiga | शेगावात कचरापेटीचे वितरण

शेगावात कचरापेटीचे वितरण

शेगाव ( जि. बुलडाणा) : येथील स्वच्छता फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत कचरा पेटी वितरण भट्टड जीन परिसरात करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार ३0 मे रोजी आयोजीत करण्यात आला होता. बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष संजय सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक़्रमात स्वच्छता फाऊंडेशनच्या प्रमुख स्नेहा तन्मय ताम्हणे (लहाने), जीवकुमार पाडिया, डॉ.अभय गोयनका, जेष्ठ पत्रकार डॉ.जयंतराव खेळकर, समाजसेवीका सौ.राजकुमारी भट्टड, सा.बां.विभागाचे शाखा अभियंता किशोर मिश्रा, अ.भा.मारवाडी महिला संमेलन शाखाध्यक्ष सौ.अनिता शर्मा, सखी महिला भजन मंडळाच्या सौ.अर्चनाताई जोशी, दिनेश शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांच्याहस्ते कचरा पेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ.शोभा पालडीवाल, सौ.सरला खंडेलवाल, सौ.किरण सराफ, सौ.सुनीता चांडक, पुष्पा सराफ, उषा सावणा, सौ.हेमा मुना, सौ.सुनीता गाडोदिया, सौ.करुणा सलामपुरीया, सौ.गीता शर्मा, सौ.वनीता पुरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेहा लहाने यांनी तर संचालन अनिल उंबरकार यांनी केले. परिचय राजकुमार व्यास यांनी तर आभारप्रदर्शन संजय त्रिवेदी यांनी केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of garbage in Shiga