शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान’ पुरस्काराने गौरव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:57 AM

स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच : बुलडाणा अर्बनचे  डॉ. झंवर, उपकार्यकारी अभियंता गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भारतीय महिलांनी जगभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. भारतीय संस्कृती ही महिलांनमुळे खर्‍या अर्थाने टिकून आहे. अशा या महिलांपैकी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या जिल्हय़ातील महिलांच्या कार्याचा ‘लोकमत’च्यावतीने हा सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे या महिलांच्या कार्याची ही घेतलेली दखल आहे, असे मत बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी येथे व्यक्त केले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी आयोजित शानदार सोहळ्यात लोकमत सखी मंचच्यावतीने   कर्तृत्ववान महिलांचा ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला,   यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर बुलडाणा पाटबंधारे मंडळाच्या उपकार्यकारी अधिकारी अभियंता क्षितिजा गायकवाड उपस्थित होत्या. बुलडाणा अर्बनच्या कामानिमित्त जगभर भ्रमंती करताना भारतीय महिलांनी केलेल्या कार्याची जाणीव प्रत्येक ठिकाणी झाल्याचे ते म्हणाले. भारतीय स्त्री ही सृजनशील व धाडसी आहे. त्यामुळेच त्यांच्या हातून अलौकिक कार्य झाले असल्याचे ते म्हणाले. सुसंस्कृत समाज निर्मितीमध्ये  महिलांचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. पाटबंधारे मंडळाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड यांनी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून ‘लोकमत’ने उचललेले हे  पाऊल कौतुकास्पद आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वाच्या या गौरव समारंभाने आपण भारावून गेल्याचे त्या म्हणाल्या. यासोबतच महिला सक्षमीकरणासंदर्भातही त्यांनी त्यांची भूमिका मांडली. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्‍वास वृद्धिंगत होऊन विविध क्षेत्रात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. अशा कार्यात सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचेही त्या म्हणाल्या.प्रास्ताविकात ‘लोकमत’चे नीलेश जोशी यांनी पुरस्कारामागील भावना विशद करून महिला सक्षमीकरणासाठी ‘लोकमत’च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सन्मान करण्यात आलेल्या सखींनीही त्यांचे मनोगत व्यक्त करीत काम करीत असताना आलेल्या अडीअडचणी व त्यावर कशी मात केली, याबाबत सांगितले.   विविध    क्षेत्रातील नागरिकांसह महिलांची कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. 

सखी सन्मान पुरस्कार विजेतेजीवनगौरव - डॉ. इंदूमती लहानेसामाजिक - प्रेमलता सोनोनेआरोग्य - भावना कॅम्बेलक्रीडा - डॉ. कामिनी मार्मडेसाहित्य - गोदावरी पाटील