विदारक! कर्ज जिंकलं, बळीराजा हरला! विहिरीत उडी घेऊन युवा शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

By अनिल गवई | Published: October 5, 2023 07:19 PM2023-10-05T19:19:26+5:302023-10-05T19:19:46+5:30

३८ वर्षांच्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Disappointing News as young farmer ended his life by jumping into a well due to loan debts | विदारक! कर्ज जिंकलं, बळीराजा हरला! विहिरीत उडी घेऊन युवा शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

विदारक! कर्ज जिंकलं, बळीराजा हरला! विहिरीत उडी घेऊन युवा शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

googlenewsNext

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: कर्जबाजारीपणाला कंटाळून लोखंडा तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. मोहन किसना लोखंडकार (३८) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

मृत शेतकरी मोहन लोखंडकार यांच्यावर बँकेचे कर्ज आहे. कर्ज थकल्यामुळे या बँकेने त्यांना नोटीस ही पाठविली. तेव्हापासून ते विवंचनेत होते. तणावातून गुरूवारी सकाळी त्यांनी गावातील एका सरकारी विहिरीत उडी घेतली. ही घटना काही काळाने उघडकीस आली. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Disappointing News as young farmer ended his life by jumping into a well due to loan debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी