शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

३३0 गावांसाठी विकास योजनांचा आराखडा तयार

By admin | Updated: February 28, 2015 01:12 IST

५३८ कोटींचे नियोजन; गावनिहाय आराखड्यांवर दिला भर.

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रथम टप्प्याचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा २६ फेब्रुवारी रोजी तयार करण्यात आला आहे. यात ५३८ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३३0 गावांमध्ये जलसंधारणाची कामे होणार आहेत. यातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल.ह्यसर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्ण अंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या त ३३0 गावांमध्ये नऊ विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवड करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन व जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या गावात कोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत, याची माहिती नोडल अधिकार्‍यांना द्यावयाची असून, त्यानंतर विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवारामध्ये निवडलेल्या गावांचा अभ्यास करून गावनिहाय आराखडा तयार केला आहे. यामध्ये होणार्‍या कामांवर जिल्हास्तरीय समितींचे लक्ष राहणार असून, या कामांमधून सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाचाही उद्देश सफल होईल व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल, अशी आशा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी व्यक्त केली. *जिल्हास्तरीय समिती गठित टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांचा समावेश आहे.