मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:16 AM2017-09-30T00:16:17+5:302017-09-30T00:16:40+5:30

बुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये  जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३  ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याचे घोषि त करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे  वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरुस्त करणे, मतदार यादीतील  नावाची निश्‍चिती करण्यात येणार आहे. मतदारांनी प्रारूप मतदार  याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची निश्‍चिती करून  घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी केले.

To determine the name of the voters list - Pulkundwar | मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार

मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण १९ लक्ष ११ हजार १२३ मतदार संख्याजिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये  जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३  ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याचे घोषि त करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे  वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरुस्त करणे, मतदार यादीतील  नावाची निश्‍चिती करण्यात येणार आहे. मतदारांनी प्रारूप मतदार  याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची निश्‍चिती करून  घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी केले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेंद्र देशमुख व  निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मतदारांची दोन  ठिकाणी नावे असल्यास ती त्वरित स्वत:हून नागरिकांनी रद्द  करण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, एकच नाव  मतदार यादीत दोन ठिकाणी असल्यास मतदारांनी एक नाव  त्वरित वगळावे. एकाच ठिकाणी नाव ठेवावे. मतदार यादीत दोन  ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे. 
त्यामुळे नागरिकांनी सजग राहून  दोन ठिकाणी नाव असल्यास  एकच नाव ठेवावे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी ३ ऑक्टोबर  २0१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, चूक दुरुस्त करणे यासाठी  विशेष मोहिमांचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. ते पुढे  म्हणाले, जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात  आलेल्या विशेष मोहिमेत नवीन मतदारांनी चांगल्या प्रकारे प्र ितसाद दिला आहे. जिल्ह्यात ३५ हजार १२३ मतदारांची नोंदणी  करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या  १९ लक्ष ११ हजार १२३ मतदारसंख्या आहे. तसेच या मोहिमेत  १0 हजार ४४३ मतदार मयत आहेत. त्यांची नावे कमी करण्यात  येणार आहेत. 

असा आहे मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करणे : ३ ऑक्टोबर २0१७ , दावे  व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : ३ ऑक्टोबर ते ३  नाव्हेंबर २0१७ पर्यंत, मतदार यादीमधील संबंधित भागाचे/से क्शनचे ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व  आरडब्ल्यूएसोबत बैठक आणि नावांची खातरजमा ७ ऑक्टोबर  ते १३ ऑक्टोंबर २0१७ , विशेष मोहिमांचे आयोजन : ८ ऑ क्टोबर व २२ ऑक्टोबर २0१७ , दावे व हरकती निकालात  काढणे : ५ डिसेंबर २0१७ पर्यंत, डाटाबेसचे अद्यावतीकरण :  २0 डिसेंबर पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ५ जानेवारी  २0१८.

Web Title: To determine the name of the voters list - Pulkundwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.