अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:10 AM2017-12-06T01:10:11+5:302017-12-06T01:12:55+5:30

सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.

Demonstrations against the protest of suppressing agrarian agitation in Akola | अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

Next
ठळक मुद्देयशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचा निषेधचिखलीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.
सोयाबीन, कापूस व धानाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या व इतर  मागण्यांसाठी अकोला येथील शेतकरी जागर मंचाने ४ डिसेंबर २0१७ रोजी गांधी जवाहर बागेतून  मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी  जात असताना अकोला पोलिसांनी यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  व शेतकर्‍यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत येथून हलणार नाही, अशी  आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरुद्ध धाकद पटशाही केली. 
पोलिसांच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले असून, मंगवारी बुलडाणा जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात  शासनाचा निषेध करून तीव्र निदर्शने केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत झालेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच स्थानबद्ध करण्या त आलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व शेतकर्‍यांची बिनशर्त सुटका करून शेतकर्‍यांच्या  मागण्या विनाविलंब मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.
शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास व यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांची  तातडीने सुटका न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाभर तीव्र  आंदोलन करेल, असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला.
 या आंदोलनामध्ये त्यांच्यासह श्याम अवथळे, शे. रफिक, शे. करीम, प्रदीप शेळके, महेंद्र  जाधव, पवन देशमुख, शे. वसीम, गंगाधर तायडे, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, कडूबा मोरे,  अमिन खासाब, हरिभाऊ उबरहंडे, गजानन गवळी, रशीद पटेल, डॉ. भानुदास जगताप, शे.  साजिद, राजू पन्हाळकर, मुकुंदा शिंबरे, डिगंबर हुडेकर, दत्तात्रय राऊत, गुलाबराव काळवाघे,  मुश्कीन शाह, समाधान धंदर, शत्रुघ्न तुपकर, गोपाल जोशी, रमेश जाधव, रामेश्‍वर जाधव,  नारायण चंदेल, रामदास खसावत, विनोद कांबळे, गजानन पवार, धनंजय मुरकुटे, राहुल गाडे,  पंकज शेजोळे, शे. अजीज, संदीप तांगडे, गोटू जेऊघाले, रामेश्‍वर जाधव, गजानन जाधव,  पुरुषोत्तम तांगडे, सतीश नवले, पद्माकर गवई, मयूर सोनुने, जाबीर खान, नीलेश पुरभे, बाबुराव  सोनुने, अमोल मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची त्वरेने सुटका न केल्यास तथा मागण्या मान्य न केल्यास  स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
 

Web Title: Demonstrations against the protest of suppressing agrarian agitation in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.