कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:45+5:302021-07-16T04:24:45+5:30

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अंधारात साप बाहेर निघतात. साप चावल्याचे अनेक प्रकारे ग्रामीण भागात पाहायला मिळत असून अंधाराचा फायदा ...

Demand for permanent executive engineer | कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता देण्याची मागणी

कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता देण्याची मागणी

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अंधारात साप बाहेर निघतात. साप चावल्याचे अनेक प्रकारे ग्रामीण भागात पाहायला मिळत असून अंधाराचा फायदा घेऊन अनेक भुरटे चोरही आपला हेतू साध्य करतात. त्याच बरोबर पिठाच्या गिरण्या लाईन नसल्यामुळे बंद राहत आहेत. यामुळे अनेक लोकांना विद्युतपुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागते. या संदर्भात कार्यालयांमध्ये तक्रार कोणाकडे करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी अभियंत्याची स्वतंत्र नेमणूक करावी अशी गावातील लोकांची मागणी होत आहे.

गावात विद्युत प्रवाह वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे कधीकधी दिवसभर तर कधी रात्रभर विद्युत प्रवाह बंदच राहतो. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही. कधी पिठाच्या गिरण्या बंद राहता. दळण सुद्धा दळून मिळत नाही. अंधाराचा सामना करत असताना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी दुसरबीड येथील कार्यालयाला कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता द्यावा.

पार्वतीबाई प्रल्हाद डोईफोडे, माजी सरपंच दुसरबीड.

विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्यामुळे घरामध्ये अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत खंडित झाल्यास घरामध्ये लाईट लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्याचप्रमाणे शासनाने रॉकेल देणे सुद्धा बंद केले. त्यामुळे कोणतीही पर्यायी व्यवस्था राहत नाही. गिरणी, पिण्याचे पाणी ह्या सुविधा प्रभावित होत आहेत. महावितरणच्या कार्यालयामध्ये कुणीही नसल्यामुळे आपल्या तक्रारी कुणाला सांगावे हा मोठा प्रश्न निर्माण आहे.

राखीताई वैभव देशमुख, माजी उपसरपंच दुसरबीड.

विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले

महावितरणच्या या कार्यालयाला कायमस्वरूपी अभियंता नसल्यामुळे येथील वीज वितरण कार्यालयाचा कारभार ढेपाळला आहे. या प्रकाराकडे कर्मचाऱ्यांची सुद्धा लक्ष दिसून येत नाही. त्याचबरोबर याठिकाणी असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, या कार्यालयामध्ये ठेकेदाराकडून पुरवली जाणारी मदतनीस यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Demand for permanent executive engineer