अपघाती विम्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST2021-03-31T04:34:59+5:302021-03-31T04:34:59+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी हतेडी येथे यंत्रचालक या पदावर काम करणारे अनिल तेजराव डुकरे यांचे ३ जुलै २०२० ...

Delivery of accident insurance | अपघाती विम्याचे वितरण

अपघाती विम्याचे वितरण

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी हतेडी येथे यंत्रचालक या पदावर काम करणारे अनिल तेजराव डुकरे यांचे ३ जुलै २०२० रोजी बुलडाणावरून दुचाकीने हतेडी येथे कामावर जात असताना अपघाती मृत्यू झाला होता. त्याचे स्टार सॅलरी प्लस अकाउंट हे बँक ऑफ इंडियाच्या देऊळगाव राजा येथील शाखेत होते. याची माहिती मिळाल्यानंतर शाखा व्यवस्थापक प्रदीप थुट्टे यांनी स्टार सॅलरी प्लस अकाउंट यावर असलेल्या विम्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. कागद पत्राची पूर्तता करून ३० लाख रुपयांचा धनादेश स्व. अनिल डुकरे यांच्या पत्नी पल्लवी डुकरे व भाऊ अनिल डुकरे यांचाकडे सुपुर्द केला. यावेळी बँक अधिकारी संदीप खंडागळे, रुपेश बगाडे, बँक कर्मचारी कैलास वायाळ, शिवराज ठाकरे, स्वप्नील खुमकर, मंगेश जोशी, नीलेश बाठे, सचिन भाग्यवंत, संदीप साबळे, गणेश खंडागळे, प्रमोद जाधव, प्रशांत आढे, मयूर खैरे यांची उपस्थिती होती.

Web Title: Delivery of accident insurance