शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

मोह सोडल्यास यश निश्‍चित- गणेशपुरे

By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवात गणेशपुरे यांचे प्रतिपादन.

चिखली : आपण निर्माण केलेल्या कलाकृतींचा मोह सोडणे, त्या कलाकृतीच्या प्रेमात न पडणे., आपण केलेल्या कलाकृतींची कुणी प्रशंसा केल्यावर जर आपण त्या कलाकृतीच्या प्रेमात पडलो तर आपण ति थेच थांबलो आणि संपलो असे समजावे. आपण निर्माण केलेल्या कलाकृतींच्या मोह सोडून जर नवनवीन कलाकृतीकडे आपण वळत राहिलो तर निश्‍चितच यशस्वी व्यक्तिमत्व घडल्याशिवाय राहणार नाही, असे विचार सुप्रसिद्ध हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले. स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोहात विशेष पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी अमरावती विद्यापीठाचे अभियांत्रिकी विद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बामनोटे, प.रा. मौनीबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर. यादव, विश्‍वस्त सिद्धेश्‍वर वानेरे, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, डॉ. एस.व्ही. आगरकर, डॉ. आर.पी. चोपडे, डॉ.आर.जी. कोकाटे, प्रा. नीलेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी डॉ. जी.आर. बामनोटे यांनी रोजगार ही आजची समस्या नसून, कुशल मनुष्यबळाची कमतरता ही आजची समस्या आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:मध्ये विविध कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवी राजभुरे यांनी तर आभार नवनाथ खर्चे, किशोर कोरडे यांनी मानले.