जळगाव जामोद : मद्य प्राशनाने जळगाव शहरातील संदीप विठ्ठल घोलप (वय २५) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. घरची गरिबी आणि त्यात दारूचे व्यसन यामुळेच संदीपचा बळी गेला आहे. याप्रमाणे अनेक तरूण शहरात दारूचे व्यसनाधीन झाल्याचे दिसतात. मागील आठवड्यातच जळगावातील दारूबंदीसाठी महिलांनी एसडीओ कोर्टावर मोर्चासुद्धा काढला होता, हे विशेष. उन्हाळा असल्याने वाढलेले उष्णतामान आणि सततचे दारू पिणे, पोटात अन्न न घेणे; यामुळेच संदीपचा मृत्यू झाल्याचे समजते. संदीप हा अविवाहीत तरूण होता. त्याच्या पश्चात ६५ वर्षीय म्हातारी आई व भाऊ असा परिवार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}