शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

By admin | Updated: April 15, 2017 00:13 IST

लोणार : तालुक्यातील खुरपूर येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण शिवाजी घुले यांचा ११ एप्रिल रोजी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

भीतीमुळे ग्रामस्थांनी दिला नाही खांदा : खुरपूरमध्ये आरोग्य पथक दाखल

लोणार : तालुक्यातील खुरपूर येथे स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण शिवाजी घुले यांचा ११ एप्रिल रोजी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याची वार्ता गावात पसरल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मृतक शिवाजी घुले यांना स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने खांदा दिला नाही. अखेरीस बैलगाडीमध्ये मृतदेह ठेवून स्मशानभूमीमध्ये नेण्यात आला. शुक्रवारी खुरपूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने भेट देऊन स्वच्छता केली. तसेच सदर रुग्णाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला काय, हे औरंबादवरून अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे. खुरपूर गावातील शिवाजी विश्वनाथ घुले (वय ३९) यांना चार- पाच दिवसांपासून ताप आला असल्यामुळे उपचारासाठी लोणार येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ताप कमी होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रायगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. यमगीर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर शुक्रवारी खुरपूर गावात आरोग्य पथक दाखल झाले. यावेळी गावात ज्या रुग्णांना ताप आहे, त्यांची तपासणी करण्यात आली. शिवाजी घुले यांना स्वाइन फ्लू असू शकतो, अशी शंका डॉ. एन. डी. यमगीर यांनी व्यक्त केली. याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी औंरगाबाद येथील रुग्णालयाकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर कळणार आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. यावेळी गावातील नागरिकांना तोंडावर बांधण्यासाठी मास्कचे वाटपही करण्यात आले. खुरपूर गावाला तहसीलदार सुरेश कव्हळे, नंदकिशोर मापारी, पंडित वाबळे व शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे यांनी भेट दिली. स्वाइन फ्लूचा रुग्ण ताप आल्यावर अन्न सेवन करीत नाही. शिवाजी घुले मात्र, रुग्णालयात जेवण करीत होते. तसेच स्वाइन फ्लू आधी गावात डुकरांना होतो, त्यानंतर माणसांना होतो. त्यामुळे शिवाजी घुले यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला असावा, याची शक्यता कमी आहे. अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. - डॉ.एन.डी. यमगीर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रायगाव.