मळणी यंत्रात ओढला गेल्याने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये हळहळ
By अनिल गवई | Updated: October 15, 2022 12:06 IST2022-10-15T12:04:29+5:302022-10-15T12:06:11+5:30
पिंप्री देशमुख येथील घटना

मळणी यंत्रात ओढला गेल्याने युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये हळहळ
बुलडाणा - खामगाव तालुक्यात सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख शेत शिवारातील दिलीप भास्करराव देशमुख यांच्या शेतात. शुक्रवारी सायंकाळी सोयाबीन मळणीचे काम सुरू होते. यासाठी रामेश्वर प्रल्हाद थोरात यांच्या मालकीच्या एमएच २८ एजे २१२५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मळणी यंत्राची जोडणी करण्यात आली. दरम्यान, या यंत्रात सोयाबीन लोटत असताना ज्ञानेश्वर दामोदर अढाव (२५) या युवकाचा हात ओढल्या गेल्याने त्याचे संपूर्ण शरीर मळणी यंत्रात अडकले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठल बाळकृष्ण अढाव (२७) यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.