विहिरीत पडून दापत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:49 IST2017-09-06T19:49:09+5:302017-09-06T19:49:28+5:30
तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील दाम्पत्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

विहिरीत पडून दापत्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील दाम्पत्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
सहस्त्रमुळी येथील मंगेश अशोक सावळे (वय २६ वर्षे), प्रियंका मंगेश सावळे (वय २५ वर्षे) या पती- पत्नी मंगळवारी रात्री विहीरीत पडले. सदर घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहीरीतुन काढुन पंचनामा केला. याबाबत मनोहर ओंकार सावळे रा . कोथळी यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डे करीत आहेत. या घटनेबाबत परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर दाम्पत्याचे मागील वर्षीच लग्न झाले होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.