शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संचारबंदीत कृउबासमध्ये उसळली गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:01 IST

Khamgaon News कोरोना संचारबंदीत गुरूवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गर्दी उसळली

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदीत गुरूवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गर्दी उसळली. धान्य खरेदी-विक्री बाजारासह गुरांच्या बाजारातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने उपविभागीय अधिकारी आणि पोलिस पथकाने याठिकाणी धडक दिली. पालिका पथक आणि पोलीसांनी हस्तक्षेप करीत कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केलेत.  बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना विषाणू संक्रमनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी टप्प्या-टप्प्याने संपूर्ण जिल्हात जीवनावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू केली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णयही जिल्हाधिकाºयांनी घेतला. जिल्ह्यातील कोरोना हॉस्टस्पॉट केंद्रांची निश्चिती करीत, संबधित तालुक्यातील प्रशासकीय अधिकाºयांची बैठक घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश दिलेत. गत गुरूवारी खामगाव येथे भेट देत, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दीची पाहणी केली. त्यानंतर खामगाव येथील बाजार समिती बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि पोलीस  प्रशासनाने पाहणी करून खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील शेतकºयांच्याच शेतमालाच्या खरेदी-विक्रीला संमती दिली. पंरतू, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांची तसेच जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे गुरूवारी सकाळी दिसून आले.

  कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यातील गर्दी नियंत्रणासाठी जिल्हाधिकाºयांनी नियमावली ठरवून दिली आहे. नियमावलीचा चुकीचा अर्थ काढीत गुरूवारी बाजार समितीत गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. त्यामुळे बाजारात गर्दी उसळली. ही बाब निदर्शनास येताच बाजार समिती प्रशासनाला बाजार बंद ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले. पोलीसांच्या मदतीने बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यात आली.- राजेंद्र जाधव

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती