शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या हंगामात निवडणुकीचे पीक

By admin | Updated: July 22, 2015 23:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील राजकारण तापले.

बुलडाणा : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यानंतर दोन दिवसांपासून शॉवरसारखा पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे काही परिसरात पिकांना जीवनदान मिळाले असून, दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पेरणीच्या या दिवसात सध्या पावसाची प्रतीक्षा असतानाच निवडणुकीचे पीक जोमात फोफावले असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता ग्रामपंचायतचे राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी ५२१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून, गावपुढार्‍यांना आता सत्तेचे डोहाळे लागले आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करताना हे पुढारी दिसू लागले आहेत. गावागावात सत्तेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सर्वांचे लक्ष सरपंचपदाकडे लागले आहे. ग्रामविकासाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत असते. त्यामुळेच सरपंचपद हे महत्त्वाचे मानले जात आहे. सरपंचपदासाठी आपले पॅनल व आपल्याच गटाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी अक्षरश: स्पर्धा लागल्याचे दिसते. पाच वर्षांपूर्वी गटातटात विभागलेली गावे आता पूर्वपदावर आली, असे वाटत असतानाच निवडणुकीचा बिगुल फुंकला गेला आहे. पुन्हा गावागावांत गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार नसतात. पक्षीय चिन्हही नसतात. शुद्ध चारित्र्याचा उमेदवार निवडण्याकडे मतदारांचा नेहमीच कल असतो; मात्र अनेकदा शुद्ध चारित्र्यवान व्यक्तीही निवडून आल्यावर जनतेला विसरल्यासारखा वागतो. अनेक ग्रामस्थांनी तसा अनुभव व्यक्त केला. गावपुढार्‍यांनी आपापले उमेदवार शोधून अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला आहे. गावावर वर्चस्व ठेवण्याची चढाओढ, गावातील दबदबा याकरिता गावपुढारी वाटेल ते राजकारण करताना दिसतात.

*सागवण ग्रामपंचायतमध्ये एकाच घरात चार वार्डाचे मतदार

           बुलडाणा शहरालगत असलेल्या सागवण ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. येथील सहा वार्डामध्ये उमेदवारांनी फिल्डींग लावली असून उमेदवारांना आधी मतदार यादीचाच अभ्यास करावा लागत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक सोडला तर उरलेल्या सहा वार्डामध्ये एकाच घरातील सदस्यांना विभाजीत करून मतदार नोंदणी केली आहे. वडील वार्ड क्रमांक दोन तर आई चारमध्ये, मुलगा सहामध्ये तर सून वार्ड पाच मध्ये अशा प्रकारे मतदारांच्या नावाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.