शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कृषीपुरक व्यवसायासाठीही आता खेळत्या भांडवलावर पतपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:42 IST

बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार  रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. द

- नीलेश जोशी बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार  रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. दरम्यान, त्यानुषंगाने रिझर्व बँकेसह नाबार्डने अनुक्रमे सात आणि १३ फेब्रुवारी रोजी एका परिपक्षत्रकान्वये निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीने चार एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याबाबतचे कर्ज दर निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्यांना उपरोक्त मर्यादेपर्यंत तारण देण्याची अवश्यकता राहणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे.मात्र एक लाख ६० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा पतपुरवठा शेतकर्यांना करताना त्यांच्याकडून तारण घेतले जाणार आहे. तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत हा पतपुरवठा केला जाणार असल्याचे नाबार्डच्या  सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. कृषी पुरक व्यवसायामध्ये प्रामुख्याने पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योगासाठी हा पतपुरवठा केला जाणार आहे.आचार संहितेच्या कटाच्यात अडकलेला जिल्ह्याचा तीन हजार ८७५ कोटी रुपयांचा वार्षिक पतआराखडा २४ एप्रिल रोजी जाहीर झाला असून खरीपासाठी यात एक हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातंर्गत तीन लाख ७१ हजार ७२ शेतकर्यांना यंदा पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात पीककर्ज वाटपाचा टक्का हा अनुक्रमे २६.१३ आणि ३४.१५ टक्केच राहला आहे. त्यामुळे वार्षिक पतआराखड्यात कृषी क्षेत्राचा वाटा ९५ टक्के असणार्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे. त्यातच गेल्या १८ वर्षात जिल्ह्यात दोन हजार ७५५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पाहता जिल्हा अग्रणी बँकेने हा मुद्दाही अधिक गांभिर्याने घेतला आहे. त्यामुळे शेती पुरक व्यवसायासाठी स्वतंत्रपणे पतपुरवठ्याचे लक्षांक निश्चित करण्यात आले नसले तरी पीककर्जाअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना पतपुरवठा करण्याबाबच्या सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.

दीड लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी लागणार तारणहा पतपुरवठा करताना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत अल्प व अत्यल्प भूधारकांना तारण देण्याची गरज राहणार नाही. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत त्यांना गरजेनुसार पतपुरवठा मिळू शकणार आहे. मात्र त्यापेक्षा अधिक व तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतचा पतपुरवठा घेताना तारण द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात दोन लाख ८५ हजारांच्या आसपास किसान क्रेडीट कार्डधारक शेतकरी आहे. त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. त्यांच्या वर्किंग कॅपीटल अर्थात खेळत्या भांडवलाच्या आधारावर किंवा त्यांच्याकडे असलेल्या गुरे तथा तत्सम पशुंच्या एककाच्या आधारावर हा पतपुरवठा केला जाऊ शकतो, असे नाबार्ड तथा जिल्हा अग्रणी बँकेच्या सु६ांनी सांगितले. शेती नसलेले परंतू शेती पुरक व्यवसाय करणारे स्वतंत्रपणे यासाठी कर्जाची मागणीही करू शकतात. याबाबत जिल्ह्यातील बँकांनाही सुचना दिल्या गेल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अशा पद्धतीने होऊ शकतो पतपुरवठातपशील        युनीट        तज्ज्ञ समितीने शिफारस केलेले कर्जदरदुग्ध व्यवसाय        १ जनावर        १४,००० रुपयेछोटे रवंथ करणारी गुरे    १०+१        १२,१००मत्स्यपालन        प्रती हेक्टर        ४५,०००कुकुटपालन        -------        ------मांसाळ पक्षी        १०० पक्षी        १६,०००अंडी देणारे पक्षी        १०० पक्षी        ३०,०००रेशीम उद्योग        प्रती हेक्टर        ४५,०००

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज