शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपूर्ण गाव बनविणे ही समृद्ध गाव स्पर्धेची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

धामणगाव बढे : जगाला हेवा वाटावा असे स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव बनविणे हेच समृद्ध गाव स्पर्धेचे उद्दिष्ट असून, सत्यमेव ...

धामणगाव बढे : जगाला हेवा वाटावा असे स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव बनविणे हेच समृद्ध गाव स्पर्धेचे उद्दिष्ट असून, सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचे हे पुढचे पाऊल आहे. सामाजिक कार्यासाठी लोक एकत्र येऊ शकतात हे पानी फाउंडेशनच्या जनआंदोलनातून सिद्ध झाले आहे. ही फक्त सुरुवात असून, खरी लढाई पुढे असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी केले. मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ग्रामीण भागातून लोकांचे होणारे विस्थापन ही चिंतेची बाब आहे. ते रोखले जावे, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले जीवन जगता यावे त्यासाठी खेडी स्वयंपूर्ण होणे काळाची गरज आहे. हाच प्रयत्न समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, माजी सरपंच विमल कदम प्रामुख्याने उपस्थित होते. सत्यजित भटकळ यांनी सिंदखेड येथील विविध कामांची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी गावातील तसेच शिवारातील विकासकामांची माहिती दिली. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी या भागातील भौगोलिक परिस्थिती, पाणी व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. गावकऱ्यांच्या एकीतून झालेल्या कामांची दखल प्रशासन घेत असते. त्यामुळे मी आज सिंदखेड गावात उपस्‍थित आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर यांनी केले. सूत्रसंचालन पानी फाउंडेशनचे समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे यांनी केले. यावेळी खान्देशचे समन्वयक सुखदेव भोसले ,विदर्भ समन्वयक सुभाष नानवटे, प्रभाग समन्वयक सचिन बोरसे, तालुका अभियान व्यवस्थापक संदीप जाधव, तांत्रिक प्रशिक्षक सुमीत गाेरले आदी उपस्थित हाेते. यावेळी प्रवीण कदम यांचे सत्यजित भटकळ यांनी काैतुक केले.