Coronavirus: बुलढाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 12 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 08:58 IST2020-04-08T08:58:38+5:302020-04-08T08:58:50+5:30

आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातून एकूण 124 जणांची स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

Coronavirus: The number of coronavirus artery patients reached 12 | Coronavirus: बुलढाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 12 वर

Coronavirus: बुलढाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 12 वर

बुलढाणा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचे संख्या आता बारा वर पोहोचली आहे. मंगळवारी पाठविलेले  12 स्वाब नमुन्यांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 11 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह अहवाल आलेला व्यक्ती चिखलीचा राहणारा आहे. त्यामुळे चिखली मधील कोरोना बाधित मुलांची संख्या तीन वर पोहोचली आहे. मंगळवारी बारा जणांची स्वाब नमुने पाठवण्यात आले होते. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातून एकूण 124 जणांची स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी बहुतांश नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे पैकी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एका रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. जवळपास अर्धा बुलढाणा जिल्हा कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडला आहे.

Web Title: Coronavirus: The number of coronavirus artery patients reached 12