शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:35 PM

खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे.

ठळक मुद्देचिखली, देऊळगाव राजा तालुक्यासह चितोडा गावाची सीमा सील. जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहर व तालुक्यांच्या सीमा सील करणे व तत्सम कार्यवाही तातडीने जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून पाच एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातील चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता नऊवर पोहोचली असून यातील एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.या गंभीर बाबीच्या पार्श्वभूमीवर चिखली, देऊळगाव राजा आणि चितोडा येथे क्लस्टर प्लॅन अ‍ॅक्टीव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातून अलिकडील काळात पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी चार जणांचे स्वॅब नमुने हे पॉझीटीव्ह आल्याचे दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळललेला भाग सील करण्यासोबतच तेथे आरोग्य पथकाद्वारे हायरिस्क झोनमधील नागरिकांची आगामी १४ दिवस तपसाणी, संबंधीत शहर व तालुक्यांच्या सीमा सील करणे व तत्सम कार्यवाही तातडीने जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. महसूल, आरोग्य, पोलिस, जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासनाच्या समन्वयातून हा प्लॅन कार्यान्वीत करण्यात येत आहे.केद्र सरकारच्या व्हीसीमध्ये अधिकाऱ्यांची उपस्थितीकेंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षा विभाग ज्या मंत्रालयातंर्गत येतो त्या विभागाचे सचिव यांनी देशातील राज्यांच्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांकडून व्हीसीद्वारे सविस्तर माहिती घेतली. या व्हीसीस बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, एस. पी. डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारकडून दिलेल्या सुचना व मार्गदर्शक तत्वे तथा क्लस्टर प्लॅन प्रत्यक्ष राबविण्याबात या व्हीसीत गांभिर्याने सुचना दिल्या गेल्या.भिलवाडा जिल्ह्याचा आदर्श ठेवा!या व्हीसीमध्ये राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्या पद्धतीने अन्यत्र काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून व्हीसीद्वारे भिलवाडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांनीही त्यांनी अवलंबलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली असल्याचे सुत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkhamgaonखामगावChikhliचिखली