शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ५७५ जणांना दिली काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 12:34 IST

Corona Vaccine बुलडाणा जिल्ह्याने ९५ टक्के लक्ष्य पूर्ण केले असून, जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देसहा केंद्रावर ६०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले हाेते.बुलडाणा जिल्ह्याने ९५ टक्के लक्ष्य पूर्ण केले. जिल्ह्याला १९ हजार डाेस मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोविड लसीकरणाचा आज देशभर शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी सहा केंद्रावर ६०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले हाेते. त्यापैकी ५७५ जणांना लस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या हस्ते लसीकरण सत्राचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उद्घाटन करण्यात आले.        जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदींसह आराेग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. लसीकरण सत्रात पहिली लस बुलडाणा येथील डॉ. सोनाली मुंढे-इलग यांना  देण्यात आली. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यात बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय सोबतच शेगाव, दे. राजा, खामगाव, चिखली व मलकापूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.पहिल्या टप्यात १४ हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली असून जिल्ह्याला १९ हजार डाेस मिळाले आहेत. सहा केंद्रावर नियमीत लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

लसीकरणात जिल्हा राज्यात दुसराखामगाव : कोरोनाला रोखण्याकरिता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. राज्यात सर्वाधिक लसीकरणासाठी दिलेले लक्ष्य हिंगोली जिल्ह्याने १०० टक्के पूर्ण केले असून, बुलडाणा जिल्ह्याने ९५ टक्के लक्ष्य पूर्ण केले असून, जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. संपूर्ण जगाला वेठीस धरणाºया कोविड १८९ विषाणूविरूद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला राज्यात शनिवारी प्रारंभ करण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस