शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 12:43 IST

Corona test of those who roam in Khamgaon : विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्याचा उपाय शहर पोलिसांनी सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तरीही अनेक नागरिकांची शहरात भटकंती सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्याचा उपाय शहर पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामध्ये शनिवारी १२५ जणांची चाचणी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’च्या उपाययोजना लागू केल्या.  या अंतर्गत केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. सकाळी शहरात सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून रोगाचा प्रसार होण्याची  शक्यता असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांकडून रस्त्यांवर फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे.शनिवारी नांदुरा रोडवरील गांधी गार्डनसमोर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड  टेस्ट केली. त्यासाठी  आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी डॉ.अवंती गवई, डॉ.संजय चव्हाण, डॉ.अमोल अढाव, डॉ.जावेद खान, गजानन निमकर्डे यांनी नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर सर्वांचे नाव पत्ता, मोबाइल नंबर व आधार नंबर घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. ही  मोहीम शहर  पोलीस पो.स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी राबविली.

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस